अकोला (प्रतिनिधी) – पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या जनतेच्या तक्रार निवारण सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. तक्रार निवारण सभेला सहकार्य करीत असल्याबददल पालकमंत्री यांनी जनतेचे आभार मानले. तसेच तक्रारींचे तातडीने निराकरण केले जात असल्याबददल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. ते म्हणाले की, सर्वसामान्यांच्या हितासाठी मागील दीड वर्षापासून तक्रार निवारण सभा अविरतपणे सुरु आहे. यामध्ये सर्वांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. यापुढेही जनतेच्या प्रत्येक तक्रारीचे निराकरण केले जाईल.
दरम्यान, तक्रार निवारण सभेमुळे सर्वसामान्यांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण होत असल्याने तक्रारकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. सार्वजनिक समस्यांसोबत वैयक्तिक तक्रारींचेही निराकरण होत असल्याने तक्रार निवारण सभा जनतेसाठी दिलासादायक उपक्रम बनला आहे.
आज झालेल्या तक्रार निवारण सभेत विविध विभागांच्या 184 तक्रारी प्राप्त झाल्या. या सभेच्या माध्यमातून तक्रारदारांना दिलासा मिळाला असून अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी स्वत: लोकांकडे जाऊन त्यांच्या तक्रारी स्विकारल्या. यावेळी त्यांनी तक्रारदारांची सहानुभूतीपूर्वक चौकशी करुन तक्रारींचा 15 दिवसांच्या आत निपटारा करण्यात येईल, असा दिलासाही त्यांना दिला.
जनतेच्या तक्रार निवारण सभेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, पालकमंत्री यांचे विशेष कार्यअधिकारी उज्ज्वल चोरे आदींसह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सामुहिक तक्रारींची त्वरीत दखल घेऊन संबंधीत विभागाच्या अधिका-यांना तक्रारीवर कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले. यावेळी वीजेमुळे झालेल्या नुकसान भरपाईची प्रकरणे निकालात काढण्यासाठी महावितरणने कॅम्प आयोजित करण्याची सूचना पालकमंत्री यांनी केली. तसेच प्रवाशांसाठी रात्री दहा वाजेला अकोला-वाशिम दरम्यान एस.टी. बस सुरु करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यासह विविध तक्रारींच्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करण्याची सूचना त्यांनी केली.
विभागनिहाय प्राप्त झालेल्या तक्रारींचा तपशील पुढील प्रमाणे आहे, महसूल विभाग –64 तक्रारी, पोलीस विभाग—18, जिल्हा परिषद– 47, मनपा-11, विद्युत विभाग –12, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था-3, भूमी अभिलेख – 5, कृषी विभाग –5, एस.टी. महामंडळ-1, पाटबंधारे विभाग-3, जिल्हा शल्य चिकित्सक-1, जिल्हा अग्रणी बँक –6, जिल्हा विपनण अधिकारी – 1, जात पडताळणी समिती-1, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना-2, सार्वजनिक बांधकाम विभाग-2, जिल्हा कारागृह-1, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठ-1 तक्रारी यावेळी प्राप्त झाल्या.
प्रारंभी पालकमंत्री यांनी सार्वजनिक प्रश्नांच्या तक्रारी स्विकारल्या. यानंतर पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी नवीन आलेल्या अर्जदारांचे निवेदने स्वत: तक्रारकर्त्याकडे जावून स्विकारले. 15 दिवसाच्या आत सबंधीत विभागाकडून आपणास आपल्या तक्रारीवर काय कार्यवाही करण्यात आली या बाबतचा अनुपालन अहवाल कळविण्यात येईल. अशी तक्रारकतर्यांना ग्वाही दिली व संबंधीत अधिका-यांना तशा सुचना दिल्यात. जनतेच्या तक्रारीचे व्यवस्थीत समाधान व्हावे हा या उपक्रमामागचा उददेश असल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील म्हणाले.
पालकमंत्री यांनी विभागनिहाय तक्रारी स्विकारल्या. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांसमक्ष तक्रारकर्त्यांचे म्हणने ऐकून घेत अधिकाऱ्यांना तक्रारीवर तातडीने कार्यवाही करण्याची सूचना केली. आज झालेल्या जनतेच्या तक्रार निवारण सभेत एकूण 184 तक्रारी जनतेकडून प्राप्त झाल्या. यामध्ये वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्वरुपाच्या तक्रारींचा समावेश होता. विविध विभागांच्या कामांबाबतच्या लेखी स्वरूपातील तक्रारी नागरिकांनी पालकमंत्री यांना दिल्या. तक्रारींचा निपटारा करण्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी संबंधित विभागाप्रमुखांकडे विचारणा करुन त्याचे त्वरित निराकरण करण्याबाबत सूचित केले. तत्पुर्वी पालकमंत्री यांनी मागील सभेत प्राप्त तक्रारींवर अधिका-यांनी काय कार्यवाही केली याबाबत चौकशी केली. झालेल्या कार्यवाहीवर तक्रारदारांचे समाधान झाले का, याची विचारणा त्यांनी तक्रारदारांना करुन विभागनिहाय तक्रारी स्विकारल्या.
अधिक वाचा : शिक्षकांच्या प्रलंबीत समस्या पंधरा दिवसात निकाली काढण्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे निर्देश
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola