पातूर (प्रतिनिधी) – गुप्तधन काढणारी टोळी असल्याच्या संशयावरुन बेलूरा परिसरात एका वाहनासह पाच जणांना नागरिकांनी पकडुन पातूर पोलीसांच्या ताब्यात केले. पोलिसांनी या पाचही जणांची कसून चौकशी केली. चौकशी अंती पोलिसांना हा दुसराच प्रकार असल्याचे समोर आले. परंतु इकडे पातूर तालुक्यात मात्र धन काढणारी टोळी पातूर पोलिसांनी पकडल्याचे वार्तेन सर्वत्र खळबळ उडाली होती. दरम्यान, हे पाच जण अकोल्यातले असुन ते या परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासुन संशयितरित्या फिरत होते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
आज सोमवारी सकाळी पातूर पोलिसांना फोन आला कि बेलूरा शेतशिवारात गुप्तधन काढणारी टोळी पकडुन ठेवलेली आहे. पातूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाच जणांना कारसह पकडुन पोलीस स्टेशनला आणले. या पाच जणांमध्ये दोन महिला, दोन पुरुष व कार चालक यांचा समावेश आहे. पोलिसांनी या पाचही जणांची कसून चौकशी सुरु केली. दोन तासाच्या चौकशी अंती हा प्रकार गुप्तधनाचा नसुन दुसराच वाद असल्याचे समोर आले. हे पाचही जण अकोल्यातले असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.
अधिक वाचा : अकोल्यात जुगाराच्या दोन अड्ड्यांवर छापे; 50 जणांवर कारवाई, गुन्हा दाखल
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola