अकोला(सुनील गाडगे) -१४ फेब्रुवारी रोजी काश्मीर मध्ये पुलवामा या ठिकाणी झालेल्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यात आपले जवान शहीद झाले ते कोणाचे भाऊ तर कोणाचे वडील आणि कोणाचे पती होते त्यातील काहींच्या कुटुंबाची तर पूर्ण जवाबदारी त्यांच्यावर होती आज हे गेले त्यांना वीरमरण आले म्हणजे त्यांच्या परिवारावर एक खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. यांचा मृत्यू एवढा ही स्वस्त नसतो हो जेवढा जवानांच्या वाट्याला येतो आयुष्य भराची स्वप्न असतात, कुटुंब असत, मित्र असतात पण त्या पेक्षाही मोलाची ठरते ती ह्यांची देशभक्ती विचार करा ज्या वयात आपण आयुष्याचा आंनद घेत असतो. त्याच वयात ही माणसं देशासाठी शहीद होतात म्हणून यांच्या साठी थोडस कर्तव्य म्हणून रामराज्य सामाजिक प्रतिष्ठान व मातोश्री मित्रपरिवार तसेच गजानन नगर मित्रपरिवार व समस्त डाबकी रोडवासी मित्रपरिवाराच्या सहाय्याने आज दिनांक १६/०२/२०१९ रोजी संध्याकाळी ६.३० वाजता राजकमल हॉटेल डाबकी रोड ते जयहिंद चौक पर्यंत भव्य कँडल मार्च आयोजित करून जयहिंद चौक येथिल नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्या जवळ श्रद्धांजली अर्पण करून कँडल मार्च ची सांगता केली यावेळी शेकडो च्या संख्येने युवक वर्ग उपस्थित होता.
अधिक वाचा : देवरी गाववासीयांच्या वतीने पूलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola