बेलखेड (चंद्रकांत बेंदरकार): आज पासून येथील श्री संत गजानन महाराज मंदिरामध्ये प्रगटदिन उत्सवानिमित मंदिरामध्ये श्रीमद भागवत कथा व गजानन विजय ग्रंथ पारायण सोहळा तथा रामायण सोहळा आयोजीत केलेला आहे. भागवतकर म्हणून हभप ठाकरे महाराज, पारायण साठी हभप मनोहर महाराज खुमकर, व रामायणा करता हभप कुळकर्णी महाराज लाभलेले आहे. मंदिरामध्ये दररोज पहाटे काकडा 5 ते 6, श्रींचे पारायण सकाळी 9 ते 10, 10 ते 12 रामायण दुपारी 1 ते 5 भागवत कथा, हरिपाठ सायंकाळी 5 ते 6 व रात्री 8 ते 10 दरम्यान हभप देविदास महाराज वानखडे, हभप सौ. जयश्रीताई पारस्कर, हभप शिवाजी महाराज बावस्कार, हभप कु. रेखाताई वाघ, हभप रमेश महाराज दुदे, हभप गजानन महाराज निंबुकार यांचे हरिकीर्तन राहणार आहे. याकरीता गायनाचार्य म्हणून हभप कोंडीराम महाराज हभप माऊली महाराज मुंडे, मृदंगाचार्य हभप योगेश महाराज नागरगोजे मंदिराचे मुख्य पुजारी अतुल देव यांची पण सेवा अहोरात्र मंदिराला लाभत आहे. टाळकरी चांगलवाडी, पेसोडा, घोडेगाव, गाडेगाव हिंगणी, व बेलखेड येथील राहतील. या संपूर्ण सप्ताहासाठी अन्नदान करणारे गावातील अशोक खुमकर, विजय खुमकर, श्रवण खुमकर, गजानन वसे, शालिग्राम खुमकर, गजानन धनभर, गणेश कुयटे, विलास कुयटे, अरुण खुमकर, रामजी टोहरे, बालमुकुंद खुमकर, महिला भजन मंडळ शिवाजी चौक, विजय खुमकर यांचे कडून अन्नदान होणार आहे. दि. 24/02/2019 ला सायंकाळी चार वाजतापासून दिंडी सोहळा संपूर्ण बेलखेड नागरीतून निघणार असून दि. 25/02/2019 ला सकाळी 9 वाजता हभप संतोष महाराज ठाकरे यांचे काल्याचे किर्तन राहील व लगेच महाप्रसादचा कार्यक्रम राहील. तरी गावतील तसेच संपूर्ण तालुक्यतील भाविक भक्तांनी या सोहळ्याचा लाभ घावा अशी विनंती गजानन महाराज ट्रस्ट व गावकराचा कडून होत आहे.
अधिक वाचा : तेल्हारा खरेदी विक्री संघात अखेर तूर खरेदी नोंदणीला सुरुवात, पुंडलिक अरबट यांच्या मागणीला यश
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola