तेल्हारा दि.१६ – जम्मुकाश्मीर मधील पुलवामा येथे दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या विर जवानांना तेल्हारा येथे १६ फेब्रुवारी रोजी कँन्डल मार्च काढुन भावपुर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली . या कॅडल मार्चची सुरवात तेल्हारा शहरातील शहीद स्मारक जुने स्टँन्ड येथुन करण्यात आली मोचीपुरा ते टाँवर चौक ते संत तुकाराम महाराज चौक ते डाँ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान चौक आणी पुन्हा टाँवर चौक येथे येऊन विर जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली या कँन्डल मार्च रँली दरम्यान विर जवान अमर रहे पाकीस्तान मुर्दाबाद,भारत माता की जय, वंदे मातरम अशा प्रकारचे नारे देण्यात आले यावेळी टा़ँवर चौक येथे पाकीस्तान चा ध्वज जाळुन निषेध व्यक्त केला या कँन्डल मार्चमध्ये सर्व नागरीकांनी सहभाग घेवुन आपला निषेध व्यक्त केला या कँन्डल मार्च चे आयोजन मिलिंद मंडळ मिलिंदनगर यांणी केले तर यामध्ये शहरातील विविध पक्षसंघटनांनी सहभाग घेतला यामध्ये सिध्दार्थ नगर पंचशिल नगर,संभाजी मंडळ शिवाजी मंडळ , भिम शक्ती, एकता मंडळ, संताजी चौक,युवाक्रांती विकास मंच काँग्रेस ,भाजपा,राष्ट्वादी काँग्रेस , शिवसेना ,भारिप बंमस, प्रहार जनशक्ती ,युवाशक्ती संघटना, सहभागी झाले होते यावेळी देवीदास भुजबले,विनोद पोहरकार,. मनिष तायडे, संघर्ष बोदळे, सुमेद गायगोळ, आनंद बोदळे, न.प.विरोधी पक्षनेता विक्की मल्ल न.प,सदस्य गोवर्धन पोहरकार,चद्रकांत मोरे,रामाभाऊ फाटकर, मंगेश ठाकरे, सोनु मलीये, न.प.सदस्य सुनिल राठोड, अनुप मार्के,अजय बघणं ,शे.मोसीन, संतोष राठी मंगेश घोंगे, अँड. संदिप देशमुख , विकास पवार,अशोक दारोकार ,अनंत सोनमाळे,रितेश बलोदे,यांचेसह असंख्य नागरीक उपस्थित होते