बुलडाणा (प्रतिनिधी) – जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 42 जवान शहीद झाले आहेत. त्यात बुलडाणा जिल्हयातील दोन जवानांचा समोवेश आहे. मलकापूर येथील संजय राजपूत तर लोणार तालुक्यातील नितीन शिवाजी राठोड या दोन्ही जवानांनी भारतमातेसाठी बलिदान दिले आहे.
शहीद संजय राजपूत हे मलकापुरातील माता महाकाली नगरातील रहिवाशी आहेत. सात महिन्यापूर्वी भावाचा अपघातात मृत्यू झाला झाला होते.
नितीन शिवाजी राठोड हे लोणार तालुक्यातील बीबी येथून जवळच असलेल्या गोवर्धन नगर तांडा येथील रहिवासी आहे. नितीन हे केंद्रीय राखीव दलाच्या तीन बटालियनमध्ये 2006 ला आसाममध्ये भरती झाले होते. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण येथील आश्रमशाळेत झाले होते तर उच्च माध्यमिक शाळा शिक्षण दुसरबीड येथील जीवन विकास महाविद्यालयातून पूर्ण केले होते. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या नितीनला लहानपणापासूनच सैनिकी सेवेची आवड होती. त्याच्याकडे दीड एकर एवढी शेती आहे. त्याचे पश्चात पत्नी, एक मुलगा व मुलगी असून आई-वडील आणि एक लहान भाऊ असा परिवार आहे.
खेळ, व्यायाम करणे याचबरोबर या गावातील तरुणांना देशसेवेसाठी प्रवृत्त करण्याचे काम नितीन सुट्टीवर आल्यावर करायचे. ते गावकऱ्यांशी अगदी प्रेमाने वागायचे. स्वभावाने मनमिळावू असलेला नितीन सर्व गावकऱ्यांना आपल्याच कुटुंबातले वाटत होते. सुटीवर आल्यावर गावातील सर्वच लहान थोरांना आवर्जून भेटत असत. त्याच्या जाण्याने गाव व त्यांच्या कुटुंबीयांना दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हल्ला होण्याच्या चार दिवस अाधीच ते पन्नास दिवसांची सुटी घेऊन 11 फेब्रुवारीला आपल्या कर्तव्यावर रुजू झाले होते. संपूर्ण गोवर्धन नगरात कालपासून संत सेवालाल महाराज जयंती उत्सवाची जय्यत तयारी करीत होते. त्यातच हे दुखद वृत्त येऊन धडकल्याने संपूर्ण गावाच्या आनंदावर विरजण पडले आहे.
अधिक वाचा : कुणबी युवक संघटनेची तेल्हारा तालुका कार्यकारणी जाहीर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola