सिंदखेडराजा (प्रतिनिधी) – राष्ट्रीयीकृत बँकांचे व्यवस्थापक शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यास टाळाटाळ करत असतील तर पहिले शांततेत सांगून पाहा, नसतील ऐकत तर माझ्याकडे तक्रार द्या, मी बघून घेतो, असा राष्ट्रीयीकृत बँकांना इशारा देत आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी असून मागील सरकारने पंधरा वर्षांत चारशे पन्नास कोटींची खरेदी केली तर आम्ही साडेचार वर्षांत तूर व हरभऱ्याची खरेदी करून ८ हजार ५०० कोटी शेतकऱ्यांना दिले. शेतकऱ्यांचे तूर व हरभऱ्याचे ऑनलाइन व ऑफलाइनचे सर्व पैसे देणार आहोत, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
माँ जिजाऊ साहेब सिंदखेडराजा विकास आराखड्यांतर्गत विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यात गुरुवारी करण्यात आले होते. या वेळी मुख्यमंत्री बोलत होते.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola