दानापूर(सुनीकुमार धुरडे)- हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत दानापूर सोनवाडी रस्त्यावरील शर्मा यांच्या शेतात विष प्राशन करून ४० वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली.
प्राप्त माहितीनुसार दानापूर येथील शेतकरी गजानन श्रीराम पिलात्रे ४० यांनी गावशेजारील शर्मा यांच्या शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.मृतकाच्या वडीलाकडे ३ एकर शेती असून त्यांच्यावर बँकेचे कर्ज असून गजानन पिलात्रे हे वडिलांची शेती बघत असत कर्जाचा डोंगर व नापिकी दुष्काळ यामुळे कर्ज बाजारीपणा मुळे आत्महत्या केली असल्याचे बोलल्या जात आहे.कर्ता पुरुष गेल्याने पिलात्रे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास हिवरखेड पोलीस करीत आहेत.
अधिक वाचा : मित्राने आत्महत्या केलेल्या झाडालाच तरुणाने स्वत:ला लावला गळफास
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola