तेल्हारा (प्रतिनिधी): तालुक्या मध्ये अनेक केशरी कार्ड धारक असलेले शेतकरी भूमिहीन अअपं विधवा शेतमजूर अशी ग्रामीण भागामध्ये चार हजार पाचशे व शहरी भागात पाच हजार व्यक्ती अशे नऊ हजार पाचशे व्यक्ती कुटुंबाची सख्या एक हजार असलेल्या केशरी कार्ड धारक लाभार्थी अन्न सुरक्षा लाभापासून वंचित होते. हीबाब शिवसेना नगर सेविका जिल्हा नियोजन समिती विजया बोचे यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी या बाबत तेल्हारा तहसीलदार यांना अवगत केले त्यानी सदर विषय जिल्हा स्तरावर समितीच्या माध्यमातून शासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यावर शासनाने याबाबत दखल घेऊन 12 जानेवारीच्या पञान्वये तहसीलदार यानी या सदर कुटुंबांना गट कुटुंब योजनेत समाविष्ट करून दोन रुपये प्रति किलो दराने धान्य मिळण्याचे अवगत केले आहे.
सदर पञ देते वेळी शिवसेनेच्या नगर सेविका विजया बोचे शिवसेना उप जिल्हा प्रमुख दिलीप बोचे तालुका प्रमुख विजय पाटील मोहोड तालुका समन्वयक प्रविण वैष्णव उपतालुका प्रमुख अजय पाटील गावंडे देवानंद फोकमारे गोपाल विखे विठ्ठल जोशी युवासेनेचे जिल्हा प्रवक्ते सचिन थाटे तालुका समन्वयक बंटी राऊत उपशहर प्रमुख सुरज देशमुख बाजीराव विखे उपस्थित होते.
अधिक वाचा : कुणबी युवक संघटनेची तेल्हारा तालुका कार्यकारणी जाहीर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola