तेल्हारा(प्रतिनिधी)- शासनाने हमीभावानुसार तूर खरेदीसाठी प्रत्येक तालुक्यात खरेदी केंद्र सुरू करण्याची तयारी केली. त्यासाठी शेतकऱ्यांना नोंदणीसाठी २३ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली; मात्र तेल्हारा खरेदी-विक्री संघात नोंदणी प्रक्रिया सुरूच न झाल्याने शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने नोंदणी प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी तेल्हारा खविसंचे संचालक, जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती पुंडलिकराव अरबट यांनी जिल्हा उपनिबंधकांना काल दि १२ फेब्रुवारी रोजी एका निवेदनातून केली होती त्यावरून आज खविस संघात तूर खरेदी नोंदणीला सुरुवात करण्यात आली आहे.
प्रत्येक तालुका स्तरावर तूर, हरभरा खरेदी करण्याचे धोरण शासनाने जाहीर केले आहे. त्यासाठी शेतकºयांना नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले. तेल्हारा तालुक्यातील शेतकºयांना तेल्हारा खरेदी-विक्री संस्थेत नोंदणी करण्याची सोय करण्यात आली; मात्र त्या ठिकाणी नोंदणीची सुविधाच उपलब्ध झालेली नव्हती. दरम्यान, नोंदणीसाठी शासनाने ठरवून दिलेली मुदत २३ फेब्रुवारी जवळ येत आहे. तरीही नोंदणी सुरू झालेली नसल्याने त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत शेतकºयांची गैरसोय होत होती. तेल्हारा खरेदी-विक्री संस्थेत तातडीने नोंदणी सुरू करावी, तसे न झाल्यास शेतकºयांवर अन्याय होणार आहे. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी पुडलीक अरबट यांनी निवेदनाद्वारे जिल्हा उपनिबंधक यांच्या कडे करून पाठपुरावा केला होता त्यावरून आज खरेदी विक्री संस्था येथे तुरीच्या नोंदणीला आज सुरुवात करण्यात आली असून अद्यापपर्यंत १३० शेतकऱ्यांनी नोंदी केल्या आहेत.नोंदणी सुरू झाल्याने शेतकर्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.तरी शेतकऱ्यांनी तूर खरेदी करीता खरेदी विक्री संस्थेत नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.