तेल्हारा(शुभम सोनटक्के)- आज दुपारी खामगाव येथून चिखलदरा येथे जात असलेले बेधुंद दुचाकीस्वारांनि एका दुचाकी स्वाराला जबर धडक दिल्याने दुचाकी स्वार जागीच ठार झाला तर बेधुंद दुचाकीस्वार जखमी झाले आहेत.
अकोट तालुक्यातील देवर्डा येथील रहिवासी दीपक आठवले हे आपल्या दुचाकीने काही कामानिमित्य दापुरा येथे जात असताना खामगाव येथून चिखलदरा येथे बेधुंद अवस्थेत जात असलेले दुचाकीस्वारांनी आठवले यांच्या दुचाकीला जबर धडक दिली यामध्ये आठवले यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.तर बेधुंद दुचाकीस्वार अनिल धुरंधर रा.सुटाळा ता खामगाव तर उत्तर प्रदेशातील पण खामगाव येथे एम आय डी सी मध्ये कामावर असलेले सुरज गौतम व रोहित गौतम हे जखमी झाले.हे तिघेही दारूच्या नशेत असल्याची माहिती असून बेधुंद होऊन गाडी चालवत असल्याने सदर अपघात घडल्याची माहिती आहे.त्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी तेल्हारा पोलीस करीत आहेत.