अकोला (प्रतिनिधी) – पोलीस भरतीबाबत शासनाने नवीन निर्णय जारी केला आहे. मात्र, त्यांचा हा निर्णय भरतीची तयारी करणाऱ्या मुलांसाठी जाचक असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीने केला आहे. तसेच हा जाचक निर्णय रद्द करावा या मागणीसाठी त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
शासनाने आगामी पोलीस भरतीच्या नियमावलीमध्ये बदल केले आहेत. त्या नियमानूसार मैदानी चाचणीपूर्वी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. तर मैदानी चाचणीचे गुणही कमी करण्यात आले आहेत. मागील ५ वर्षांत रिक्त पदांव्यतिरिक्त एकाही नवीन पदाची भरती करण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामीण भागात तसेच शहरी भागातही सुशिक्षित बेरोजगारांचे प्रमाण वाढले आहे.
प्रस्तावित पोलीस भरतीच्या दृष्टीने सर्व तरुण मागील ५ वर्षांपासून जुन्या प्रक्रियेनुसार पोलीस भरतीची तयारी करत आहेत. मात्र, शासनाने नवीन नियमांचा अचानक अवलंब केला. त्यामुळे अनेक तरुणांना एक प्रकारे वंचित ठेवण्याचे कारस्थानच सरकार रचत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे पोलीस भरतीचा नवीन निर्णय शासनाने रद्द करून जुन्या पद्धतीनेच पोलीस भरती करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जर शासनाने हा निर्णय मागे न घेतल्यास भारिप बहुजन महासंघ तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
अधिक वाचा : राष्ट्रसंत गाडगेबाबांना भारतरत्न जाहिर व्हावा- धोबी समाजाची मागणी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola