अकोला (प्रतिनिधी) : दिनांक 10 फेब्रुवारी रविवार रोजी दर वर्षी प्रमाणे अ. भा. कुणबी युवा मंच संघटनेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या जयंती सोहळा अकोला येथील प्रमिलताई ओक सभागृहात संपन्न झाला. जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रजवलन कार्यक्रमाच्या उदघाटिका सौ सुरेखताई मेतकर व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करून कार्यक्रमाला सुरवात झाली.
प्रमुख वक्त्या ऍड. वैशालीताई डोळस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या कीर्तनातून मावळे स्वराज्यासाठी वारकऱ्यांमधून धारकरी निर्माण करणारे संत तुकाराम महाराज हे खरे क्रांतिकारी संत ठरतात तसेच स्वतः स्त्रीपोटी जन्म घेऊनही स्त्रीचा स्पर्श विटाळ ठरवणारे हे संत कसे असू शकतात. असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला. तसेच वैशालीताई चोपडे यांनी संत तुकाराम महाराज यांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन मांडतांना महिलांनी कर्मकांड सोडून विज्ञानाची कास धरावी व वास्तविकता तपासून उघडडोळ्याने जगले पाहिजे असे मत व्यक्त केले. तर प्रा.डॉ. गजानन वाकोडे यांनी युवकांचा राजकारणातील सहभाग काळाची गरज या विषयावर बोलतांना योग्य व्यक्तींनी राजकारणात न येणं याची शिक्षा म्हणजे अयोग्य व्यक्तींनी आपल्यावर राज्य करणे ही असू शकते म्हणून सुशिक्षित व योग्य युवकांसाठी राजकारण हे एक चांगले क्षेत्र असू शकते कार्यक्रमामध्ये समाजामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्याअसून आपल्या कार्याने समाजापुढे एक आदर्श ठेवणाऱ्या काही मान्यवरांचा संत तुकाराम महाराज कार्य गौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये कुणबी समाज सेवा समितीचे अध्यक्ष दिपकराव भरणे, कामगार नेते तथा सामाजिक कार्यकर्ते अनंतराव भारसाकळे नागपूर, सौ. सुनीता संजय घोरळ, गौरव रामेश्वर चावके हाता, प्रतीक सुरेश गावंडे, संभाजी आनंदराव काळे, राहुल महल्ले शिवापूर बोर्डी, यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून सुरेखताई मेतकर, अध्यक्षस्थानी सुमनताई भालदाने राहतील तर कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र फाटे हे राहणार यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार ज्ञानदेवराव ठाकरे, नारायणराव गव्हाणकर, कुणबी समाज मंडळाचे अध्यक्ष, विजयराव कौसल, महादेवराव कौसल, वामनराव मानकर, राजारामजी काळणे. (खामगाव), सुरेशजी पाटीलखेडे. (मुंबई), डॉ.सुधीर ढोणे, शांतारामजी पाटेखेडे (खामगाव), शिवदास गोंड, श्रीरामजी बुरघाटे, महेंद्रजी कराळे, शोभाताई शेळके (जी.प.सदस्या), मायताई डिवरे, उजवलाताई पुंडकर, तर प्रमुख उपस्थिती म्हणून राजेशजी ठाकरे, अनंतराव भारसाकळे (नागपूर), कृष्णराव तिडके (मुंबई), मंगेशजी भारसाकळे (खामगाव), माळी समाजाचे अध्यक्ष रामदासजी खंडारे, संताजी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोदभाऊ देंडवे, कुणबी युवा मंचचे मार्गदर्शक अरविंदजी महाले, दिपकराव भरणे, आधारस्तभं दिलीपभाऊ सावरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. संत तुकाराम महाराज जयंतीच्या कार्यक्रमाची रूपरेषा आपल्या प्रताविकातून कुणबी युवा मंचचे अध्यक्ष माणीक शेळके यांनी विशद केली. कार्यक्रमाचे संचालन शाम राऊत यांनी तर आभार प्रदर्शन किशोर कुचके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुणबी युवा मंचचे शिवा महल्ले, राजेश्वर वाकोडे, बाळकृष्ण दांदळे, अविनाश मातळे, भूषण बिचारे, स्वप्नील अहिर, तुषार डांगे, श्रीकांत गावंडे, गजानन रोकडे, शुभम दळवी, अक्षय आखरे, गोलू मुळे, आनंद गाढे, अनिल भुलतीलक, अनंतराव फाटे, मंगेश गोळे, गोपाल वाकोडे, शाम बहुरूपे, अजय धांडे, विजय धर्माळे योगेश ठाकरे,विकास रोम,वैभव बहुरूपे, हरिष इंगळे, आदी पदाधिकारी प्रयत्न केले.
अधिक वाचा : तुदगांव येथे सुरक्षा बिमा योजना शिबीर संपन्न
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola