तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा तालुक्यातील ग्राम तुदगांव येथे युनियन बँक आँफ इंडिया च्या वतीने प्रधानमंत्री जन धन योजना अंतर्गत बिमा योजना शिबीर घेण्यात आले.
प्रधानमंत्री जन धन योजना अंतर्गत १८ वर्षावरील व ७० वर्षाआतील अशा सुमारे २०० च्या वर खातेदारांचा युनियन बँक आँफ इंडिया ने “प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना” हा १२ रु. प्रतिवर्ष असा बिमा काढुन देण्यात आला ज्यामुळे विमाधारकाचा म्रुत्यु झाल्यास त्यांच्या वारसांला दोन लाख रुपयांचा लाभ मिळेल . त्यासाठी गावातील ग्रामपंचायत कार्यालयात युनियन बँकेच्या वतीने एका शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
ज्यामध्ये स्वतः जन धन योजनेचे जिल्हा समन्वयक परमेश्वर इंगळे यांनी नागरीकांचे फाँर्म भरून घेतले. हे शिबीर युनियन बँकेच्या नागपुर कार्यालयाच्या आदेशावरुन युनियन बँक तेल्हाराचे व्यवस्थापक मा. गजानन घायल यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले तसेच सरपंच उपसरपंच व गावातील नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
अधिक वाचा : बालकांच्या संरक्षणासाठी ‘चाइल्ड लाइन १०९८’ आज अकोल्यात शुभारंभ
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola