अकोला(प्रतिनिधी)- दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या जयंती सोहळ्याचे आयोजन रविवार 10 फेब्रुवारी रोजी अकोला येथील प्रमिलताई ओक सभागृहात आयोजित केला आहे.
आयोजकांचे हे 5 वे वर्ष असून यावर्षीचा कार्यक्रम हा महिलाशक्ती व युवाशक्ती ला पुरस्कृत असून यामध्ये संत तुकोबारायांचे परिवर्तनवादी विचार, स्त्रीविषयक दृष्टिकोन, समाजातील बुरसटलेल्या चालीरीती, अंधश्रद्धा, विज्ञानवादी दृष्टिकोन, राजकारणातील युवकांचा सहभाग आदी मार्मिक विषयांवर चिंतन करण्यात येणार असून आपल्या कार्याने समाजापुढे एक आदर्श ठेवणाऱ्या काही मान्यवरांचा “संत तुकाराम महाराज कार्य गौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित सुद्धा करण्यात येणार आहे. सकाळी 11 वा सुरु होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रमुख वक्त्या म्हणून स्त्री-शक्तीची बुलंद तोफ ऍड. वैशालीताई डोळस, औरंगाबाद. या “संत तुकाराम महाराज एक क्रांतिकारी संत” या विषयावर व्याख्यान करणार आहेत. तर वैशालीताई चोपडे, नागपूर. या “संत तुकाराम महाराज यांचा स्त्री-विषयक दृष्टिकोन व प्रा.डॉ. गजानन वाकोडे हे “राजकारणातील युवकांचा सहभाग काळाची गरज” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाला उदघाटक म्हणून सुरेखताई मेतकर, तर अध्यक्षस्थानी सुमनताई भालदाने राहतील तर कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र फाटे हे राहणार आहेत.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार ज्ञानदेवराव ठाकरे, नारायणराव गव्हाणकर, कुणबी समाज मंडळाचे अध्यक्ष, विजयराव कौसल, दयारामजी वानखडे. (शेगाव), महादेवराव कौसल, वामनराव मानकर, प्रकाशजी बोर्डे, राजारामजी काळणे. (खामगाव), सुरेशजी पाटीलखेडे. (मुंबई), रमेशजी तिव्हाने. शेगाव, डॉ.सुधीर ढोणे, शांतारामजी पाटेखेडे (खामगाव), सुभाषराव दातकर, प्रकाशजी डिवरे, शिवदास गोंड, शालिग्रामजी वारुळकर, श्रीरामजी बुरघाटे, महेंद्रजी कराळे, शोभाताई शेळके (जी.प.सदस्या), मायताई डिवरे, उजवलाताई पुंडकर, या राहणार आहेत. व प्रमुख उपस्थिती म्हणून राजेशजी ठाकरे, अनंतराव भारसाकळे (नागपूर), कृष्णराव तिडके (मुंबई), मंगेशजी भारसाकळे (खामगाव), सामाजिक कार्यकर्ते प्रा.डॉ. संतोषजी हुशे, शिंपी समाजाचे अध्यक्ष महादेवराव हुरपडे, नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष नंदूभाऊ बोपुलकर, माळी समाजाचे अध्यक्ष रामदासजी खंडारे, कलाल समाजाचे नेते चंदुभाऊ सावजी, संताजी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोदभाऊ देंडवे, धोबी समाजाचे नेते अनिलभाऊ शिंदे, मल्हार गर्जना युवाचे सुहासभाऊ साबे. कुणबी युवा मंचचे मार्गदर्शक अरविंदजी महाले, दिपकराव भरणे, आधारस्तभं दिलीपभाऊ सावरकर हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुणबी युवा मंचचे अध्यक्ष माणीक शेळके, उपाध्यक्ष शिवा महल्ले, कोषाध्यक्ष राजेश्वर वाकोडे, सचिव सागर दळवी, सदस्य बाळकृष्ण दांदळे, किशोर कुचके, अविनाश मातळे, बाळकृष्ण टिकार, भूषण बिचारे, हेमंत ढोरे, मंगेश लांडे, स्वप्नील अहिर, जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव फाटे, पातूर ता.अध्यक्ष मंगेश गोळे, तेल्हारा ता.अध्यक्ष नरेंद्र चितोडे, बार्शीटाकली ता.अध्यक्ष राजेश सावरकर, बाळापूर तालुकाध्यक्ष गोपाल वाकोडे, उपाध्यक्ष शाम बहुरूपे, अजय धांडे, विजय धर्माळे आदी पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत.
अधिक वाचा : अकोल्यात जुगाराच्या दोन अड्ड्यांवर छापे; 50 जणांवर कारवाई, गुन्हा दाखल
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola