मुंबई : कधी, कुठे आणि कोणाच्या पोटी जन्म घ्यावा, हे कोणाच्याच हातात नसतं. खरं तर, जन्म दिल्याबद्दल अनेक जण आपल्या आई-वडिलांचे आजन्म ऋण व्यक्त करतात. मात्र मुंबईतील एका तरुणाला याच गोष्टीचा राग आला आहे. आपल्या संमतीविना आपल्याला जन्म दिल्याबद्दल हा तरुण पालकांना कोर्टात खेचण्याच्या तयारीत आहे.
मुंबईत राहणारा 27 वर्षांचा राफेल सॅम्युअल आई-वडिलांना कोर्टात खेचण्याच्या तयारीत आहे. राफेल स्वतःला अँटी नॅटलिस्ट (जन्मविरोधी) म्हणवतो. जर अर्भकाची जन्म घेण्याला संमती नसेल, तर पालकांना त्याला जन्म देण्याचा हक्क नाही, असं राफेलचं मत आहे.आपलं आई-वडिलांसोबतचं नातं उत्तम आहे, असं एकीकडे सांगताना राफेलला 27 वर्षांनी आपल्या जन्मदात्यांना कोर्टात खेचावंसं वाटत आहे. आपली संमती न घेतल्याबद्दल तो दोघांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहे.
अधिक वाचा : संत तुकाराम महाराज जयंती निमित्य जुने शहर येथे नियोजन बैठक संपन्न
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola