तेल्हारा (प्रतिनिधी) : शासनाने गावागावात शांतता राहावी तसेच गावातील तंटे गावातच मिटवल्या गेली पाहिजे यासाठी पोलीस पाटलांची प्रत्येक गावात नियुक्ती करण्यात येते. मात्र तेल्हारा तालुक्यातील अर्धी जास्त गावे ही पोलीस पाटलांविना असल्याने रिक्त असलेली पदे त्वरित भरावी यासाठी पोलीस पाटील संघटना यांच्या वतीने गृहराज्यमंत्री डॉ रणजित पाटील यांच्या कडे एक निवेदन सादर करून रिक्त असलेली पदे त्वरित भरावी अशी मागणी केली आहे.
तेल्हारा तालुक्यात तेल्हारा व हिवरखेड पोलिस स्टेशन असून सदर दोन्ही पोलीस स्टेशन हद्दीमधील पोलीस पाटलांची पदे बऱ्याच वर्षांपासून रिक्त असून जवळपास ६० टक्के पदे रिक्त आहेत.अनेक पोलीस पाटलांकडे दोन ते तीन गावांचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे.तर काही गावातील पदे रिक्त असून त्या गावांचा प्रभार कुठल्याच पोलिस पाटलांकडे नसल्याने पोलीस पाटील दाखल्यासाठी येथील नागरिकांना नाहक त्रास होऊन पायपीट करावी लागत आहे.तसेच रिक्त पदे असलेल्या गावात शांतता व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास अडचणी निर्माण होतात.त्यामुळे रिक्त असलेली पदे त्वरित भरावी अशी मागणी डॉ रणजित पाटील गृहराज्यमंत्री यांच्या कडे पोलीस पाटील संघटनेचे तेल्हारा तालुका अध्यक्ष अरविंद अवताडे,उपाध्यक्ष मनोहर यादगिरे,सचिव गणेश पाथ्रीकर,सदस्य सुरेश अडघते, प्रमोद कोरडे यांच्यासह समस्त पोलीस पाटलांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
अधिक वाचा : अकोल्यात जुगाराच्या दोन अड्ड्यांवर छापे; 50 जणांवर कारवाई, गुन्हा दाखल
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola








