अकोला(प्रतिनिधी)- दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी शुक्रवारी केली. त्यानुसार अकोला जिल्ह्यात दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या २ लाख ४३ हजार ९५० शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी प्रत्येकी सहा हजार रुपये जमा होणार आहेत. त्यासाठी वर्षाकाठी जिल्ह्याला १४६ कोटी ३७ लाख रुपयांची रक्कम मिळणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर पंतप्रधान मोदी सरकारच्या कार्यकाळातील अर्थसंकल्प अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी संसदेत सादर केला. त्यामध्ये शेतकºयांसाठी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना लागू करण्यात येणार असून, या योजनेंतर्गत दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असणाºया शेतकºयांच्या बँक खात्यात दरवर्षी प्रत्येकी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले. त्यानुसार अकोला जिल्ह्यात दोन हेक्टरपर्यंत (पाच एकरपेक्षा कमी) शेतजमीन असलेल्या २ लाख ४३ हजार ९५० शेतकºयांच्या बँक खात्यात दरवर्षी प्रत्येकी सहा हजार रुपयांची रक्कम जमा होणार आहे. त्यानुषंगाने या योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकºयांसाठी वर्षाकाठी १४६ कोटी ३७ लाख रुपयांची रक्कम मिळणार आहे.
अधिक वाचा : प्रहार जनशक्ती पक्षाने शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी केले ठिय्या आंदोलन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola