अकोला (प्रतिनिधी) : मनपा अतिक्रमण विभाग विभागामार्फत शहरातील बसन स्टेडियम समोरील रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आले. तसेच रामदास पेठ रोडवरील रस्त्यांवरील अतिक्रमणे टीन शेड, ओटे आदी हटवण्याची कारवाई करण्यात आली. जिल्हा न्यायालयासमोरील स्व. अरुण दिवेकर मार्ग ते टिळक पार्क ते सातव चौकापर्यंत रस्त्यालगत उभारलेले तब्बल १४० पेक्षा जास्त अनधिकृत होर्डिंग, फलकाचा मनपाने सफाया केला.
अकोलेकरांनी दिले नियोजन
मनपाने होर्डिंग, फलक लावण्यासंदर्भात धोरण निश्चित करण्याची गरज आहे. यासाठी शहरातील उच्चपदस्थ अधिकाºयांची निवासस्थाने अर्थात ‘व्हीव्हीआयपी’, ‘व्हीआयपी’व्यक्तींचा परिसर, प्रमुख रस्ते, मुख्य बाजारपेठ, गर्दीची ठिकाणे, विद्यूत खांब आदी जागा निश्चित करून नेमक्या किती जागेवर होर्डिंग लावणे अपेक्षित आहे, यासंदर्भात शहरातील सजग नागरिक म्हणून डॉ. चिमनभाई डेडिया यांनी नियोजन दिले आहे.
…तर दंडाची होणार आकारणी
शहरात अनधिकृत होर्डिंग किंवा फलक दिसल्यास संबंधितांकडून दंड वसूल केला जाण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने हालचाली सुरू केल्याची माहिती आहे. दंड जमा न केल्यास फौजदारी कारवाईचा पर्याय खुला आहे.
अधिक वाचा : मैत्रेय वाचनालयात महात्मा गांधी स्मृतिदिन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola