अकोला (प्रतिनिधी) : नेहरू युवा केंद्र आयोजित राष्ट्रीय स्तरावरील महाराष्ट्रातून एकमेव स्पर्धक शिवाजीचा एम. काँमचा विद्यार्थी अक्षय भाऊराव राऊत ह्याने दुसरा क्रमांक पटकावला. अक्षयने ह्यापातळीपर्यंत येतांना राज्य स्तरावरील नेहरु युवा केंद्राच्या ह्यावर्षीच्या सर्व स्पर्धा यशस्वीरित्या जिंकून राष्ट्रीय स्तरावर मजल मारली.
गणतंत्र दिवस समारोह राष्ट्रीय रंगशाल शिबीर येथे, केंद्रीय संरक्षण मंत्रालय आयोजित सत्कार समारंभ सोहळा-2019 पार पाडण्यात आला तेव्हा कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून,भारताच्या केंद्रीय संरक्षण मंत्री, श्रीमती.निर्मला सीतारामन उपस्थित होत्या. गणतंत्र दिवस 2019 मध्ये सहभाग नोंदविलेल्या पथकांचे व 24 व 25 जानेवारीला पार पडलेल्या,नेहरू युवा केंद्र आयोजित राष्ट्रीय स्तरावरील भाषण स्पर्धेत विजेते पद भूषविणाऱ्या विजेत्यांचा सत्कार मोठ्या थाटात संपन्न झाला. राष्ट्रिय पातळीवर महाराष्ट्राची मान उंचावून शान वाढवणारा महाराष्ट्राचा बुलंद युवा आवाज श्री शिवाजी महाविद्यालयाचा एम.काँमचा विद्यार्थी अक्षय भाऊराव राऊत याला केंद्रीय संरक्षण मंत्री श्रीमती. निर्मला सीतारामन यांच्या हस्ते सन्मानित करून पुरस्काराने गौरविण्यात आले.
तेव्हा उज्वल देशाच्या भविष्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. हा सन्मान फक्त अक्षय राऊत चा नसून सम्पूर्ण महाराष्ट्राचा सोबतच देशाचा सुद्धा आहे.महाराष्ट्राच्या कुशीत जन्मलेल्या भारतमातेच्या या पुत्राला भावी वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. असून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे व श्री शिवाजी महाविद्यालयाचे नाव व एकूणच महाराष्ट्राचे नाव दिल्ली सारख्या राजधानीमध्ये अक्षयने कोरले आहे. त्यामुळे अक्षयवर कौतुकाचा वर्षाव शिव परिवार व महाराष्ट्राभरातून होत आहे. अक्षयने आपल्या यशाचे श्रेय श्री शिवाजी महाविद्यालय अकोला येथील प्रत्येक घटकांना दिलेले आहे. अक्षयची भाषणाकौशल्यासोबतच विनयता वाखाण्याजोगी असल्याचे दिसून आले. महाविद्यालयाचे प्राचार्य व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अक्षयचे अभिनंदन व कौतुक केले आहे.
अधिक वाचा : मैत्रेय वाचनालयात महात्मा गांधी स्मृतिदिन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola