अकोला (प्रतिनिधी) : जिल्हा सूर्योदय मंडळातर्फे महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘सूत्र’ उत्सवाचे गांधी जवाहर बागेत आज आयोजन करण्यात आले होते. यावेळी गांधी विचारवाद्यांनी सूतकताई करून गांधीजींना श्रद्धांजली अर्पण केली.
महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त ठिक-ठिकाणी कार्यक्रम होत आहेत. गांधी जवाहर बागेमध्ये गांधी विचारधारा असलेले सूर्योदय मंडळाचे सदस्य व पदाधिकारी हे दरवर्षी गांधी जवाहर बागेत महात्मा गांधी यांना सूतकताई करून आदरांजली अर्पण करतात. आजही हा कार्यक्रम घेऊन मंडळाच्या सदस्यांनी सूत्र उत्सव साजरा केला. या उत्सवात सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सूतकताई करून खादीला प्रोत्साहित करण्याचे काम या मंडळातर्फे करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महात्मा गांधीच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यात आला.
यावेळी सूर्योदय मंडळाचे महादेवराव भुईभार, अॅड. रामसिंह राजपूत, वसंतराव केदार, शंकरराव सरप, डॉ. मिलिंद निवाने, बबनराव कानकिरड, रामचंद्र राऊत, रामदास शेळके, बंडू ढोमणे, आकाश इंगळे आदी उपस्थित होते.
अधिक वाचा : लोकजागर मंचतर्फे स्वच्छता अभियान राबवून राष्ट्रपित्याला अभिवादन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola