अकोला (प्रतिनिधी) : मागील निवडणूकीत भाजपा ने जनतेला भरघोस आश्वासने देऊन केंद्र व राज्यात सत्ता हस्तगत केली. मात्र त्यानंतर या आश्वासनाशी काहीही देणेघेणे न ठेवता जनतेला वेठीस धरणे म्हणजे जनता जनार्दनाचा अवमान होय. म्हणून हे कृत्य करणा-या भाजपाला उखडून फेका असे प्रतिपादन अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष डॉ.सुभाषचंद्र कोरपे यांनी केले. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसाध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांच्या निर्देशानुसार गावोगावीच्या जनसंपर्क अभियान राबवितांना चांगेफळ येथील कार्यक्रमात ते बोलत होते.
चांगेफळ ते म्हैसपूर या रस्त्यावरील नदीवर पुलाची नितांत गरज आहे. त्याचप्रमाणे शेतीला पाणी मिळणेसाठी तद्वतच नागरीक व गुराढोरांच्या पिण्याची पाण्याची व्यवस्था करणेसाठी येथील नदीवर कोल्हापुरी बंधा-याची गरज आहे. मात्र हया मुलभूत समस्या भाजपा सरकार झूलवत ठेवीत असल्याच्या भावना नागरीकांनी व्यक्तविल्या. त्यामध्ये प्रामुख्याने अण्णासाहेब इंगळे, सरपंच बाबुराव डोलारे, गणेशराव इंगळे, गोपाळराव इंगळे, गजानन भा.इंगळे , हिंमत इंगळे, विलास इंगळे, माणिकराव इंगळे, महादेवराव पवार, ज्ञानेश्वर इंगळे, शिवशंकर इंगळे, मधुकरराव इंगळे, शिवलाल इंगळे, देविदास पाटील, जगदेव डोलारे, जनार्दन इंगळे, मोहन इंगळे, निळकंठ इंगळे, हरीभाऊ इंगळे, विनायक इंगळे, दादाराव इंगळे, वौभव इंगळे, अंकूश इंगळे, सोपान इंगळे, तेजराव इंगळे,केशवराव इंगळे, रमेशराव इंगळे, रामेश्वर इंगळे,यांचेसह गावातील बहुतांश नागरीकांची उपस्थिती होती.
काँग्रेसच्या जनसंपर्क अभियानात डॉ. कोरपे यांच्या समवेत काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते हेमंत देशमुख, रमेशमामा म्हैसने, जयंत इंगोले, अंशुमन देशमुख, प्रफुल्ल गुप्ते, गुलाबराव थोरात, बाबुराव इंगळे, गजानन डेहणकर, अजाबराव टाले, मुन्ना नहाटे, हर्षल ठाकरे यांनी सक्रिय सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे संचालन हेमंत देशमुख तर आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष जयंत इंगोले यांनी केले.
अधिक वाचा : कृतीशुन्य भाजपाला केंद्र व राज्यातुन उखडून फेका : डॉ.सुभाषचंद्र कोरपे
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola










