अकोला (प्रतिनिधी) : अकोट येथील दिव्यांग धीरज बंडू कळसाईत याने प्रजासत्ताक दिनी आफ्रिकेतील सर्वांत उंच किलीमंजारो हे हिमशिखर सर करीत भारताचा तिरंगा फडकावला.
आफ्रिका खंडातील टान्झानियामधील ईशान्य भागात केनियाच्या सीमेवर किलीमंजारो हे शिखर आहे. याची उंची १९ हजार ३१४ फूट आहे. धीरजने २३ जानेवारीला चढाईला सुरुवात करून २६ जानेवारीला सकाळी हे शिखर सर केले. गजानननगर येथील रहिवासी असलेला धीरजच्या कुटुंबाची परिस्थिती बेताची आहे. आईवडील मजुरी करून उदरनिर्वाह करतात. यातही त्याने मुक्त विद्यापीठातून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. जन्मापासून डावा हात अधू आहे. अपघातात एक पाय गमवावा लागला.तरीही जीवनात काही तरी करण्याची जिद्द त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. समाजातील काहींच्या मदतीने त्याने गिर्यारोहक होण्याचे स्वप्न पूर्ण केले.
अधिक वाचा : अकोट शिवसेनेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट सरसेनापती स्व.बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्य विविध सामाजिक उपक्रम
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola