अकोला (प्रतिनिधी) : सोलर ऊर्जा कंपनीने दिलेल्या कामाची परवानगी मिळविण्यासाठी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी तक्रारदाराकडून २ हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर दबा धरून बसलेल्या एसीबीने रंगेहाथ अटक केली. महावितरणच्या कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. मोरेश्वर नारायण शिरसे, असे आरोपीचे नाव आहे.
अकोल्यातील ५४ वर्षीय तक्रारदारांनी घरी सोलर ऊर्जा लावण्यासाठी महावितरणकडे परवानगीसाठी अर्ज केला. त्यासाठी महावितरणचे कार्यकारी अभियंता मोरेश्वर नारायण शिरसे याने तक्रारदारास २ हजार रूपयांची मागणी केली. तक्रारदाराने याबाबत अकोला लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार एसीबीने २८ जानेवारीला तक्रारीची पडताळणी केली. त्यानंतर तक्रारदार हे आज सकाळी मोरेश्वर शिरसे यांच्या कार्यालयात २ हजार रुपये लाचेची रक्कम देण्यासाठी गेले होते. त्यांनी लाच स्वीकारल्यानंतर तक्रारदारांनी एसीबीला इशारा केला. दबा धरून बसलेल्या एसीबीने कार्यकारी अभियंता शिरसे यांच्याकडून लाचेची २ हजार रुपयांची रक्कम जप्त केली. तसेच आरोपीस अटक केली. पुढील कारवाई एसीबीचे उपअधीक्षक संजय गोरले करीत आहेत.
विशेष म्हणजे महामनी महावितरणचे संचालक दिनेश चन्द्र साबू हे अकोल्यातील कार्यालयात आलेले असताना ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे संचालकांच्या प्रवेशानंतर झालेल्या या कारवाईने महावितरणच्या लाचखोरीची लक्तरे वेशीवर टांगली आहेत.
अधिक वाचा : अकोल्यात सेंट्रल बँकेचे एटीएम फोडून लाखोंची रोकड लंपास
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola











