अकोला (प्रतिनिधी) – शालेय विद्यार्थ्यांमध्ये पक्ष्यांबद्दल तसेच मतदानाविषयी जागृती व्हावी या उद्देशाने जिल्हा प्रशासन व निसर्ग कट्टा मार्फत पक्षी निवडणूक घेण्यात आली. विद्यार्थ्यांकडून उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. यामध्ये राखी मनेष, हप्पू , सुमग, गायबगळा व काळा शराटी या पाच पक्ष्यांना अकोला शहरातून उमेदवारी देण्यात आली होती.
जिल्ह्यातील ७० शाळांमधील एकूण १७८८५ विद्यार्थ्यांनी मतदान करून पुढील ५ वर्षासाठी अकोला शहर पक्षी म्हणून गायबगळा या पक्षींची निवड करण्यात आली आहे. यासाठी शहरपक्षी निवडणूक संयोजक म्हणून निसर्ग कट्टयाचे अमोल सावंत यांनी काम पाहिले.
यासाठी निसर्ग कट्टा, सामाजिक वनीकरण, महाराष्ट्र पक्षी मित्र, आधार फाउंडेशन, अजिंक्य साहसी क्लब, मॅरेथॉन नेचर क्लब, खंडेलवाल महाविदयालय, शिवाजी महाविद्यालय, आरएलटी महाविदयालय व सृष्टी वैभव या संस्थानी सहकार्य केले. तसेच पक्षी मित्र दीपक जोशी, उदय वझे, देवेंद्र तेलकर, संदीप साखरे, संदीप सरडे, अतुल जवळेकर, अजय फाळे यांनी सहकार्य केले, अशी माहिती देण्यात आली.
अधिक वाचा : अभिनेता प्रकाश राज लढवणार लोकसभा निवडणूक
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola