तेल्हारा (प्रतिनिधी) : तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था पाहता चाळणी झालेले रस्ते विनाविलंब दुरुस्त करण्याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी युवा क्रांती विकास मंच या सामाजिक संघटनेच्या वतीने 29 जानेवारीला खड्ड्यांची महापूजा करून सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यलाय तेल्हारा समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे .
युवा क्रांती विकास मंच या सामाजिक संघटनेच्या वतीने सात महिन्यांपूर्वी तहसीलदार तेल्हारा यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री , पालक मंत्री ,जिल्हाधिकारी ,सार्वजनिक बांधकाम विभाग यांना तालुक्यातील खड्ड्यांच्या दयनीय अवस्थेबाबत व बहुतांश रस्ते खड्डेमय झाल्याबाबत निवेदन देऊन रस्ते दुरुस्तीचे मागणी करण्यात आली होती. त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ आश्वासन देऊन लवकरच कामे सुरू होतील असे सांगितले होते. परंतु माळेगाव रस्ता, पाथर्डी रस्ता, बेलखेड, हिवरखेड,आरसुड इत्यादी बहुतांश रस्ते कामांना सुरुवात झाली नसल्यान प्रवाशी नागरिकांचे शरीर खिडखिडे झाले असुन मणक्याच्या आजाराने ते त्रस्त झाले आहे. तसेच एस टी बसेस सह खाजगी वाहन चालवताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे अनेक अपघात होऊन अनेक जण जखमी झाले आहेत. तर काहींना आपला प्राण सुध्दा गमवावा लागला आहे त्यामुळे रस्त्याचे काम विनाविलंब सुरू व्हावे याकरिता दिनांक 29 जानेवारीला शासनाचे लक्ष वेधण्यासाठी युवा क्रांती विकास मंचच्या वतीने उपविभाग सार्वजनिक बांधकाम कार्यालय तेल्हारा येथे धरणे आंदोलन करण्याचे ठरविले आहे. तरी या आंदोलना वाहनधारकांनसह नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन युवा क्रांती विकास मंचचे अध्यक्ष रामभाऊ फाटकर, तालुका अध्यक्ष अनंत मानखैर, शहर अध्यक्ष मोहन श्रीवास यांनी केले आहे.
अधिक वाचा : सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला महानगर तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola