पातूर (प्रतिनिधी) : भारताला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाली मात्र अद्यापही कालावधीमध्ये गोर बंजारा समाजाला हव्या त्या मूलभूत सुविधा अजूनही मिळाले नाही मूलभूत सुविधा रस्ते पाणी या मागणीसाठी पातुर तहसील समोर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आमरण उपोषण सुरू केले आहे.
पातुर तालुक्यातील डांबरी रस्ता नसलेले तांडा मलकापूर फॉरेस्ट फॉरेस्ट ते बेलतळा ते सावरगाव चौफुली ते झरंडी डागडुजी करणे पूर्ण करणे शेकापुर येथील फुल पूर्ण बांधणे आदी विविध मागण्यांसाठी वर सेनेच्या अकरा लोकांनी पातुर तहसील समोर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आमरण उपोषण सुरू केले आहे. यावेळी तालुक्यातील निष्क्रिय लोकप्रतिनिधींचा निषेध करीत तीव्र संताप व्यक्त केला आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही या भूमिकेवर ठाम आहे. उपोषणकर्त्या मध्ये विनोद जाधव, अरविंद राठोड, कसंदास राठोड, विलास जाधव, राजेश चव्हाण, प्रदीप राठोड, किरण पवार, रोहिदास राठोड, हिरालाल राठोड, दिपूला चव्हाण, गुलाब राठोड, आदि लोकांनी उपोषणास सुरुवात केली आहे. या परिस्थितीत उपोषणाला विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा देत गावकऱ्यांच्या मागणार असल्याचे मनोगत व्यक्त केले आहे. या स्थितीत थंडीचा पारा वाढला असून थंडीच्या कडाक्यात गोर बंजारा समाज बांधवांनी उपोषणास सुरुवात केली आहे. तांडा वस्तीच्या गोर समाजावर आमरण उपोषणाची पाळी भाजपा सत्तेत आल्याने अच्छे दिन कुठे हरवले असे प्रश्न तालुक्यातील जनता विचारत आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola