अकोला (सुनिल गाडगे )- दि.२६ जानेवारी २०१९ रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्त साधून रामराज्य सामाजिक प्रतिष्ठान अकोला च्या वतीने भव्य रक्तदान व रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तरी या शीबिराला शिक्षण घेण्याऱ्या युवक व युवतींनि तसेच समाजातील तरुण पिढीने मोठ्या प्रमाणात उस्फुर्त प्रतिसाद दिला व आपले अमूल्य रक्तदान करून सर्वश्रेष्ठ समाजाचा एक पाया बनले. या शिबिराच्या व सर्वांच्या सहयोगातून शेकडो च्या आसपास रक्ताच्या पिशव्या ह्या युवक व युवतींनि अकोला रकपेढीस दान करण्याचा अवीस्मरनिय निर्णय घेतला. या मागे रामराज्य सामाजिक प्रतिष्ठान चे एकच ध्येय आहे की आर्थिक तसेच शरीरिकरित्या निर्बळ असलेले तसेच दिनदुबळे गोरगरीब व दुष्काळाच्या कचाट्यात सापडलेले शेतकरी यांच्यातील गरजू रुग्णांना एक मदतीचा छोटासा हात म्हणून या भव्य रक्तदान व रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन फडके नगर डाबकी रोड अकोला या ठिकाणी करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डाबकी रोड पोलीस स्टेशन चे ठाणेदार सोळंके साहेब व अभिषेक भाऊ खरसाडे हे उपस्थित होते व प्रमुख अतिथी म्हणजेच आपल्या सगळ्यांचे आवडते सर्व वृत्तपत्र तसेच सगळ्या न्युज चॅनेल चे पत्रकार बंधू आणि बहिणी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन – ऋषिकेश गावंडे , ओम कुचर , सूरज देशमुख , धीरज देशमुख , रजत हनपुडे ,प्रतीक काळे , अक्षय लिखार , राम गावंडे , निखिल साबळे , आनंद लकडे , हर्ष चौधरी , कपिल देशमुख , संतोष रंगभाळ , पियुष पागधुणे , गोपाल शर्मा , उमेश बहिरुवाले , अक्षय नागलकर , सिद्धांत अहिर , गणेश खेळकर , वैभव कुचर , अजय मिसुरकार , छोटू वानखडे हे तसेच रामराज्य सामाजिक प्रतिष्ठान च्या शेकडो सदस्यांनी आपले मोलाचे सहकार्य देऊन या कार्यक्रमाची ही भव्य उभारणी केली व ही सर्व माहिती गोपाल भाऊ मुदगल यांनी दिली व विशेष सहकार्य केले.
अधिक वाचा : पातुरमध्ये शिवसेनेच्या वतीने घेण्यात आलेल्या त्वचारोग निदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola