तेल्हारा (प्रतिनिधी) : तेल्हारा शहरातील अतिक्रमण धारकाने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रत्येकाला घर या मार्फत घरकुल मिळावे यासाठी प्रजासत्ताक दिनी उपोषणाचा इशारा दिला होता त्यानुसार आज उपोषणाला सुरुवात केली आहे.
शहरातील वाकोडी रस्ता नवीन तिरुपती नगर सात्काबाद तेल्हारा येथील विक्रीच्या प्लॉट मधील ओपन फेज च्या जागेवर सन २०१०-११ पासून केलेले अतिक्रमण महाराष्ट्र शासनाचे धोरण नुसार व महसूल विभागाच्या अधिकारात असलेल्या कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण केलेले नियमित करून अशा नागरिकांना शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना शहरी घरकुल योजनेचा लाभ सन 2018-2019 या वर्षात देण्यात यावा अशी जिल्हा नगरपरिषद कडे मागणी केली असून याची अंमलबजावणी करण्यात न आल्याने दिनांक 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जीवन वानखडे हे तहसील कार्यालयासमोर सकाळी नऊ वाजता उपोषणास बसले आहेत नगरपरिषद कडून कुठल्या प्रकारचे दखल न घेतल्याने मला उपोषणाला बसावे लागत आहे असे जीवन वानखडे यांनी स्पष्ट केले.
यावेळी तहसीलदार डॉ येवलीकर यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषण कर्त्याचे म्हणने ऐकून घेतले व शासन स्तरावर तुमचा प्रश्न सोडवण्यासाठी पर्यन्त करू असे सांगितले.
अधिक वाचा : दुष्काळात महाराष्ट्राला पूर्ण साथ देऊ – नरेंद्र मोदी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola