पातूर (निलेश किरतकर) : पातूर नगर परिषद प्रशासन विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करीत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. आज पातूर शहरातील नगर परिषद प्राथमिक मराठी शाळा क्र.2 मधील विद्यार्थी असंख्य समस्यांनी त्रस्त असल्यामुळे रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदद्वारा पातूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या समस्या खालीलप्रमाणे मांडण्यात आल्या :-
1 ) नगर परिषद प्राथमिक शाळा क्र.2 पातूर ची इमारतिची अत्यंत निकृष्ट दर्जाची अवस्था झाली असून त्यामुळे असंख्य लहान वर्ग 1 ली ते 4 थी च्या विद्यार्थ्यांना जीव धोक्यात असून काही अनुचित प्रकारची संभाव्यता टाळता येणार नाही . वर्ग खोल्यामध्ये दरवाजाची अवस्था ही एखाद्या काडी-कचऱ्या गत झाली आहे. वर्ग खोल्या मधील खिडक्यांना कुठल्याही प्रकारचा आवार नसून लगतच असलेल्या बाळापूर हायवे वरून ये-जा करणाऱ्या वाहनांचा कर्ण-कर्कश आवाजामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षण घेण्यामध्ये खूप मोठा अडथळा निर्माण होत आहे.
2) शाळेच्या परिसरामध्ये नगर परिषद पातूर अंतर्गत बांधण्यात आलेला सांस्कृतिक सभागृह हा शाळेच्या दिवशी सुद्धा भाडे-तत्वावर लग्न व इतर शुभ कार्यासाठी देण्यात येते. त्यामुळे शाळेच्या दिवशी शिकवणी वर्ग चालू असतांना या सभागृहाला शाळेच्या मुख्य प्रवेश द्वारा मधूनच रस्ता असल्यामुळे लग्नामध्ये वाजवण्यात येणारे बँड,दि.जे., फटाके इ.गोष्टीमुळे ध्वनी प्रदूषित वातावरणामुळे विद्यार्थ्यांच्या शिकवणी वर्गाला सतत बाधा निर्माण होत असते. त्यामुळे शिकवणी वर्ग थांबवण्या व्यतिरिक्त शिक्षकाकडे दुसरा पर्याय नसतो. तरी सुद्धा नगर परिषद पातूर मार्फत चालू असणारा बेजबाबदारपणा निष्काळजीपणामुळे जर विद्यार्थ्यांच्या जीविताला व शैक्षणिक भविष्याला सर्वस्व जबाबदार नगर परिषद पातूर राहणार ह्याची नोंद घ्यावी.
वरील समस्यांना गांभीर्याने काळजी पूर्वक लक्षात घेऊन गोर-गरीब व कष्टकरी मोल-मजुरांची मुले ह्याठिकानि शिक्षण घेतात व त्यांना उद्याचा सुजाण नागरिक बनवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहावे व सर्व समस्यांचे निवारण तात्काळ करण्यात यावे. अशी विनंती करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आकाश गुलाबराव हिवराळे ( जिल्हासंघटक, रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद ,अकोला ) ह्यांनी ह्यावेळी दिला. ह्यावेळी सागर इंगळे ( सामाजिक कार्यकर्ते ),विशाल तायडे,आकाश सौंदळे, सुरेंद्र अवचार,शुभम धाडसे, कुणाल चवरे,गजानन ठाकरे आकाश सोनोने, पवन राहुळकर आदि असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेची इमारत झाली जीर्ण :
शाळेची इमारत ही अतिशय जीर्ण झाली असून, वर्गातील खिडक्यांमध्ये काच नाही आहेत. तसेच रुमला दरवाजे सुध्दा नाहीत. लाखो रुपयांचा खर्च करुन शाळेच्या मैदानाला सभोवताली विटांची वॉल कंपाउंड बांधलेली आहे. परंतु हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झालेले आहे. भविष्यात काही अनुचित प्रकारची घटना घडु नये याकडे नगर पालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
अधिक वाचा : दुष्काळात महाराष्ट्राला पूर्ण साथ देऊ – नरेंद्र मोदी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola