शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील ‘ठाकरे‘ व झाशीची राणी लक्ष्मीबाई हिची चरित्रकथा असलेला ‘मणिकर्णिका‘ हे दोन चित्रपट आज देशभर प्रदर्शित झाले. सेन्सॉरचा आक्षेप आणि करणी सेनेच्या विरोधामुळं सातत्यानं चर्चेत राहिलेले हे चित्रपट बॉक्सऑफिसवर नेमकी काय कमाल दाखवतात, याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता आहे. या निमित्तानं ‘ठाकरे’ विरुद्ध ‘मणिकर्णिका’ असा सामनाही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
दिग्गज राजकीय नेते असलेल्या दिवंगत बाळासाहेबांबद्दल महाराष्ट्रासह देशभरात प्रचंड आकर्षण आहे. त्यामुळंच ‘ठाकरे’ चित्रपटाबद्दल लोकांना उत्सुकता आहे. चित्रपटाचा ट्रेलर व गाण्यामुळं गेल्या काही दिवसांपासून ही उत्सुकता ताणली गेली होती. आज अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला. दुसरीकडं, ‘मेरी झाँशी नही दूँगी…’ म्हणत ब्रिटिशांना भिडलेली रणरागिणी राणी लक्ष्मीबाई हिच्या पराक्रमाचा इतिहास जाणून घेण्यासही लोक उत्सुक आहेत. त्यामुळं सिनेरसिक ‘मणिकर्णिका’ची वाट पाहत होते. कंगना राणावत हिनं यात राणी लक्ष्मीबाईची भूमिका केली आहे. कंगनाचा लूक आणि चित्रपटाच्या ट्रेलरमुळं प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
‘ठाकरे’ सोबत इतर कोणताही चित्रपट प्रदर्शित होऊ नये, अशी अपेक्षा शिवसैनिकांकडून व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर इम्रान हाश्मीच्या ‘चीट इंडिया’ची तारीखही बदलण्यात आली. कंगना राणावत व ‘मणिकर्णिका’च्या टीमनं मात्र प्रदर्शनाची तारीख बदलण्यास नकार दिला होता. त्यामुळं ठरल्यानुसार दोन्ही चित्रपट आज समोरासमोर आले आहेत. प्रेक्षकांची पसंती यापैकी कोणाला मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अधिक वाचा : ‘टोटल धमाल’ चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola