तेल्हारा (प्रतिनिधी)- स्थानिक डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाच्या वतीने २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आर. एम. केदार होते. व्यासपीठावर प्रा.एस. जे. फरसोले,प्रा.एम.के.ननावरे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ.कृष्णा माहुरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक माहुरे यांनी केले. यावेळी त्यांनी आपल्या प्रास्ताविकात मतदार दिनाचे महत्त्व विशद केले. त्यानंतर मतदान दिनाच्या निमित्ताने परिसंवाद आयोजित करण्यात आला. यामध्ये कुंदन परघरमोर बी.ए.भाग 3 या विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.केदार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संविधानाने भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार बहाल केला आहे त्या अधिकाराचा योग्य वापर करून निर्भयपणे आपला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय मतदान दिनाच्या निमित्ताने प्रतिज्ञा देण्यात आली.कार्यक्रमाला प्राध्यापक एस. व्ही. काळे, आर.व्ही.लोणकर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एम. केदार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
अधिक वाचा : राष्ट्रीय मतदार दिवसा निमित्ताने सावित्रीबाई फुले प्राथमिक माध्यमिक शाळा येथे चित्रकला स्पर्धांचे आयोजन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola