पातुर (सुनील गाडगे)- पातूर शहरामध्ये शिव सेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिना निमित्त भव्य त्वचारोग निदान शिबिराचे आयोजन शिव सेना पातूर शहर प्रमुख अजय ढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. ह्या शिबीरामध्ये शहरातील महिला, पुरुष, वृद्ध अशा जवळपास चारशे गरजु रुग्णांनी या शिबीराचा लाभ घेतला. ह्या शिबीरामध्ये त्वचेसंबंधी विविध आजार व त्वचारोग, सौंदर्यशास्त्र, गुप्तरोग, केशविकार, नखाच्या समस्या, मुरुम, इसब, वांग इत्यादि आजारावर तज्ञ डॉ. प्रफुल्ल वाघाडे व डॉ. आशीष खंडारे यांनी निदान करुन मोफत उपचार केले. ह्या शिबिराचे आयोजन श्री सिध्दिविनायक मैडिकल, बाळापूर रोड, पातूर येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालय राहुल शेगोकार यांनी केले.
या शिबीरामध्ये अजितदादा पाटने रवि मुर्तडकर अजय ढोणे शंकर देशमुख देवश्रीताई ठाकरे रेखाताई राउत हर्षाताई देवकर सुनंदा वालोकार डॉ. दिगांबार खुरसडे प्रमोद हाडके डॉ. शांतीलाल चव्हाण विष्णु देवकर दिलीप फुलारी राजेश भगत संतोष सावळे विकास देवकर गणेश बुलबुले विनोद तेजवाल सचिन फुलारी सुभाष राखोंडे किशोर बोंबटकार धीरज कोथळकार सचिन बारोकार मंगेश दामोदर सोमनाथ बोबडे विनोद बोंबटकार यांच्यासह शिव सेनेचे पदाधिकारी व शिव सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola