तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेला वाहतूक पोलीस पाच हजाराची लाच घेतांना अँटी करप्शन विभागाने दि १९ जानेवारी रोजी रंगेहाथ पकडले होते.त्याला न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर आज जाधव याने जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता तो आज न्यायालयाने फेटाळून लावला.
तेल्हारा पोलीस ठाण्यात गेल्या अडीच तीन वर्षांपासून कार्यरत असलेल्या तसेच वसुली मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाहतूक पोलिस प्रकाश जाधव याला लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाच हजाराची लाच घेतांना रंगेहाथ पकडले होते.शहरातील बस स्थानकच्या बाजूला असलेल्या परिसरात आनंद मेळावा तसेच स्वयंरोजगार प्रदशनी चे आयोजन केले होते. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत होता.सदर मेळावा ६ जानेवारी रोजी संपला होता.सदर मेळावा वर कारवाई न केल्याच्या मोबदल्यात वाहतूक पोलीस प्रकाश जाधव याने पाच हजाराची मागणी केली होती.अकोट येथील तक्रारदार यांनी लाच मागितल्या प्रकरणी लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यावरून दि १९ जानेवारी रोजी सापळा रचून लाचेची रक्कम घेत असताना वाहतूक पोलीस याला रंगेहाथ पकडले होते.कारवाई नंतर प्रकाश जाधव याची न्यायालयीन कोठडित रवानगी करण्यात आली आहे.आज दि २४ जानेवारी रोजी अकोट सत्र न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र आज सत्र न्यायाधीश मनीष गणोरकर यांच्या न्यायालयाने जामीन नामंजूर करून पुढील सुनावणी दि २ फेब्रुवारी रोजी ढकलण्यात आली आहे.सरकारी पक्षातर्फे अजित देशमुख यांनी बाजू मांडली.