तेल्हारा (प्रतिनिधी) : युवासेनेच्या वतीने मा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.आजचा हा दिवस संपुर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांसाठी व युवासैनिकांसाठी एक गाैरवपुर्ण मानला जातो.कारण बाळासाहेबांची शिकवण ही प्रत्येकाला नविन संदेश देत गेला..कारण बाळासाहेबांच्या मुखातून निघालेला शब्द हा माणसाच्या अंगावर जणु एक प्रकारचा काटा ऊभा करून जायचा..ताे शब्द म्हणजे एका धनुष्यातून निघालेल्या बानासारखा ह्यदयाला स्पर्श करून जायचा..आणि त्यांच भाषण ऐकल्यावर तर जणु एक वेगळीच उर्जा निर्माण हाेत हाेती. हाेता ताे काळ ज्या वेळी संपुर्ण हिंदुस्थान नतमस्तक हाेत हाेता.
हाेती ती वेळ ज्यावेळी संपुर्ण महाराष्ट्रातील शेतकरीवर्ग आपल्या कुटुंबासाेबत व आपल्या गुरांवासरासाेबत आनंदाने जगत हाेता.आणि हाेता ताे दिवस ज्यावेळी देशातील भ्रष्टाचार व जातीभेद विसरून समाजसेवा करण्याची हीम्मत प्रत्येक व्यक्तीच्या मनात रूजुन एक माणूसकीची जाणीव करून देणारा..असे हाेते आमचे बाळासाहेब..देह साेडुन गेले पण मनात घर करून गेले..अशा या हींदुह्यदयसम्राट मा,बाळासाहेब ठाकरे यांना संपूर्ण तेल्हारा तालुक्याच्यावतीने त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करीत युवासेने एक अनाेखा उपक्रम राबवत जयंती साजरी केली.या वेळी युवासेना विस्तारक मा,राहुल कराळे यांच्या हस्ते सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुजन करण्यात आले.त्यानंतर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा,बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना तेल्हारा तालुका प्रमुख विजयभाऊ मोहोड, माजी उपशहर प्रमुख पप्पू सोनटक्के, युवासेना जिल्हा प्रवक्ता सचिन थाटे , शिवसेना उपतालुका प्रमुख विखे, समनव्यक प्रवीण वैष्णव, युवासेना तालुका समनव्यक बंटी राऊत, तालुका संघटक मुन्ना पाथरीकर, शहर प्रमुख राम वाकोडे, अजय गावंडे, उपतालुका प्रमुख रोहित धामोडे, अकोट युवासेना सचिव विजू भारसाकडे, समनव्यक विशाल चौधरी, उपतालुका प्रमुख रितेश उजिळे, सागर देशमुख, वैभव गावंडे, लाभले यांच्यासह असंख्य शिवसेना-युवासेना पदाधिकारी युवसैनिक उपस्थित होते.
अधिक वाचा : राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन स्वागताध्यक्षपदी अनिल गावंडे
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola