अकोला (प्रतिनिधी) : तरुणाई फाऊंडेशन कोर्टाचा व श्री शिवाजी महाविद्यालय मराठी विभागाचे संयुक्त विद्यमानाने पहिले अकोला जिल्हास्तरीय साहित्य संमेलन सविताने वारी रोजी आयोजित केले आहे. संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यक बापूराव झटाले राहतील. उद्घाटन लोककवी प्रा. वाघ यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष संदीप देशमुख यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
स्वागताध्यक्ष डॉ. निलेश पाटील राहणार आहेत. याप्रसंगी प्राचार्य रामेश्वर भिसे, डॉ. अभय पाटील, डॉ. अभय पाटील, डॉ विनीत हिंगणकर, कृष्णा अंधारे, प्रा. राजाभाऊ देशमुख, उद्योजक गणेशराव देशमुख, अॅड. अनंत खेडकर, विनोद मापारी, अरविंद भोंडे, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संमेलन पोशिदांना समर्पित असणार आहे. शेती मातीच्या व्यथा आपल्या साहित्यकृतीतून ताकतीने जगाच्या कॅनव्हासवर आणणारे आचर्या विठ्ठल वाघ, शेतकरी संघटनेचे प्रवक्ता व स्वातंत्रवादी विचारवंत ललित बहाळे, डॉ. निलेश पाटील या प्रसंगी मागदर्शन करणार आहेत. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील पाच विद्वानांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. उद्घाटन सत्रात विविध क्षेत्रात प्रभावी काम करणारयांचा सत्कार, पुस्तक प्रकाशन सोहळा होणार आहे. कथाकथन ज्येष्ठ साहित्यिका डॉ. प्रतिमा इंगोले यांची प्रकट मुलाखत परिसंवाद, गजल, मुशायरा कार्यक्रम होणार आहे. समारोपीय सत्रात काव्य प्रतिभा व काव्यधारा कविसंमेलन होणार आहे. काव्यधारा कविसंमेलन हे सर्व कवींसाठी खुले असून यामध्ये जिल्ह्यातील शेकडोंच्या आसपास कवी सहभाग घेणार असल्याचे संदीप देशमुख यांनी सांगितले.
अधिक वाचा : राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन स्वागताध्यक्षपदी अनिल गावंडे
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola