तेल्हारा (प्रतिनिधी)– स्वछ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत हागणदारी मुक्त गावामध्ये नागरिकांनी शौचालयाचा नियमित वापर करावा उगाड्यावर शौचास बसणार्यावर कार्यवाही करण्यासाठी पंचायत समिती तेल्हारा अनर्गत गुड मॉर्निंग राबविण्यात आले झाले आहे, आज ग्रामपंचायत मनब्दा, खापरखेड, व थार येथे गुड मॉनिंग पथकाने उगाड्यावर सोचास बसणाऱ्या एकूण 41 जणांना समज देण्यात आली.
तसेच गावफेरी दरम्यान गृहभेटी देण्यात येवून शौचालयाचा नियमित वापर करा, सांडपाणी व घनकचरा, परिसर स्वच्छता, सुंदर शौचालय स्वच्छ शौचालय स्पर्धेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. उघड्यावर खत,कचरा टाकणाऱ्यांना पथकाकडून ताकीद दिली. सांडपाण्यासाठी शोष खड्डे करण्यात यावे .
गुडमॉर्निंग पथकात श्री एस.बी.सरोदे,सहा.ग.वि.अ. पथक प्रमुख, श्री. एस. वाडेकर, विस्तार अधिकारी आरोग्य, , रोशन डांबरे,संपर्क अधिकारी , ग्रामसेवक के. आर.ठाकूर, अनिल सानप, .समूह समनव्यक प्रशांत दोडेवार, शिवशंकर उन्हाळे, वाहन चालक विजय कुकडे गावचे सरपंच, पोलीस पाटील आशा, अंगानवाडी सेविका, यांचा समावेश होता.तसेच जिल्हा स्तरावरून श्री. शाहू भगत, समाजशास्त्रन्य, राजेश डहाके,माहिती शिक्षण सवांद तन्य, गणेश बोरकर, पाणी गुणवत्ता तन्य, श्री पाखरे लेखापाल, कमलपुत्र सिरसाट पत्रकार, यांनी विडिओ शुटिंग द्वारे गुड मॉर्निंग पथक राबविले तसेच उघड्यावर स्वाचास बसण्याऱ्याना समाज दिली, तसेच उघड्यावर सोचास बसल्यास आरोग्यास व परिसरात काय धोका निर्माण होते याबाबत मार्गदर्शन केले.
गावातून गुड मॉर्निंग पथकाने फेरी काढून कोणी उघड्यावर शौचास बसू नये; अन्यथा गुड मॉर्निंग पथकाने पकडल्यास १२०० रुपयांपर्यंत दंड, ६ महिने तुरुंगवास होऊ शकतो, असे संबोधण्यात आले.
अधिक वाचा : लूडो डिजिटल जुगार खेळणाऱ्या वर पातुर पोलिसांची कारवाई
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola