पातूर (सुनिल गाडगे) : पातूर शहरात तुळसाबाई कावल विद्यालय चौकातील एका टपरी मध्ये लुडो गेम जुगार सुरु असल्याची माहिती ठाणेदार खंडेराव यांना मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारावर आपल्या ताफ्यासह धाड टाकून पातुरातील चौघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबतची विदर्भातील बहुदा पहिलीच कारवाई अकोला जिल्ह्यातील पातूर या गावात केली गेली आहे. मोबाईलवर लुडो गेमवर जुगार खेळणाऱ्या 1)मंगेश महादेव सीताबराव 2)राजकुमार नारायण डोंगरे 3)राजीक अली 4)सुभेदार बेग अन्वर बेग या चार जणांवर बुधवारी पातूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून 15000 हजार रुपये रोख व चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पातुर t.k.v. चौकातील एका टपरीत लुडो डिजिटल जुगार खेळत असल्याची माहिती पातुर चे ठाणेदार डीसी खंडेराव यांना मिळाली मिळालेल्या माहितीवरून तात्काळ आपल्या स्टाफ सोबत पीकेव्ही चौकातील टपरी मध्ये बुधवारी रात्री 10:30 वाजता छापा टाकून चौघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध जुगार ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनात पातुर चे ठाणेदार डीसी खंडेराव पोलीस हेड कॉन्स्टेबल सोहेल खान मनीष घुगे श्रीधर पाटील प्रभाकर मोगरे आदींनी कारवाई केली.
अधिक वाचा : मनपाच्या तत्कालीन आयुक्तांसह शहर अभियंत्यावर कारवाई होण्याची शक्यता
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola