* तेल्हारा न प ला पडला शिवाजी महाराज उद्यान व छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराचा विसर
तेल्हारा(प्रतिनिधी)- दिल्ली पासून ते गल्लीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज नावाने निवडणुकीचा बिगुल वाजवून सत्ते मध्ये भाजप आली.तेल्हारा न प मध्ये सुद्धा भाजपची सत्ता मात्र न प कडून छत्रपती शिवाजी महाराज यांचे उद्यान तसेच छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार ची कामे पूर्ण करण्यासाठी तब्बल एक ते दीड वर्षाचा कालावधी उलटूनही सदर कामे पूर्ण होऊ शकली नसल्याने आज अखेर शिवप्रेमीनि न प मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करून काम पूर्ण करण्याची मागणी केली.
आज तेल्हारा शहरातील शिवप्रेमींनी नगर परिषद मुख्याधिकारी तसेच अध्यक्ष यांना शहरातील शिवाजी महाराज उद्यान तसेच नगर परिषदेचे मुख्य प्रवेशद्वार हे पूर्ण करण्यासाठी निवेदन दिले.निवेदनामध्ये नगर परिषद कडून टॉवर चौक स्थित शिवाजी महाराज चौक सौंदर्यकरणाचे काम गेल्या दीड वर्षांपासून सुरू असून आज रोजी सुद्धा पूर्ण झाले नाही.तसेच वारंवार राजकीय पदाधिकारी यांच्या कडून तसेच शिवप्रेमी कडून राहलेले काम पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र ती पूर्ण करण्यात आली नाही.तसेच नगर परिषद च्या मुख्य प्रवेशद्वार सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ठराव घेऊन मंजूर करण्यात आले.मात्र प्रवेशद्वार च्या कामाला सुरुवात झाली होती खरी मात्र ते काम सुद्धा गेल्या काही महिन्यांपासून अपूर्ण सोडून देण्यात आले.सदर दोन्ही कामे येणाऱ्या शिवजयंती च्या आधी त्वरित सुरू करून पूर्ण करण्यात यावी यासाठी आज तेल्हारा शहरातील शिवप्रेमींनी एक निवेदन न प प्रशासनाला सादर केले त्यात जर ही कामे शिवजयंतीच्या पहिले पूर्ण न झाल्यास शिवप्रेमींच्या आक्रोशाला सामोरे जावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी शहरातील शिवप्रेमी मुख्याधिकारी यांच्या दालनात निवेदन सादर करण्याकरिता गेले असता त्यांना हुसकावून लावण्याचा पर्यन्त केला.तसेच निवेदन घेण्याकरिता असमर्थता दर्शवली होती मात्र शिवप्रेमींनी मुख्याधिकारी यांना निवेदन घेण्यास यावेळी भाग पाडले.
अधिक वाचा : पातूर नगर परिषद मध्ये महिला कर्मचारीला शिवीगाळ आणि मारण्याची धमकी; पोलिसात गुन्हा दाखल
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola