बेलखेड (चंद्रकांत बेंदरकार): आज दिनांक 23/01/2019 रोजी बेलखेड येथे हिंदुहृदय सम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन शिवसेना उपतालुकाप्रमुख मा. संजयभाऊ अढाऊ यांच्या मार्गदर्शनात शिवसेना व युवासेना शाखा बेलखेड च्या वतीने करण्यात आले.
महादेव मंदिर येथे रुद्राभिषेक
आज सकाळी गावातील अतिशय प्राचीन अशा महादेव मंदिरात युवा सेना व शिवसेनेच्या वतीने महादेवाला रुद्राभिषेक करण्यात आला.
गरजू व्यक्तीला मायेचा आधार
बेलखेड गावातील अतिशय गरीब कुटुंबातील शेतमजूर असलेल्या गुलाब भाऊ डिगे यांचे काही दिवसापूर्वी कर्करोगाने दुःखद निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी व तीन मुली आहेत.या कुटुंबाला शिवसेना उपतालुका प्रमुख मा.संजय भाऊ अढाऊ यांच्या विशेष सहकार्यातून अन्नधान्याची मदत करण्यात आली.
यावेळी शिवसेना शाखा अध्यक्ष गजानन उर्फ भीमाभाऊ माळोकार, शिवसेना पं. स. सर्कल प्रमुख संजयभाऊ भोपळे, युवासेना उपतालुकाप्रमुख मा. निलेशभाऊ उमाळे, युवासेना पं.स. सर्कल प्रमुख सूरज खुमकर, प्रसिद्धी प्रमुख पवनदादा तायडे, युवासेना शाखाप्रमुख धीरज वानखडे, उपशाखा प्रमुख आकाश अरुडकार, सहसचिव कौस्तुभ कुलकर्णी, कार्तिक माळोकार, वैभव खुमकर, शुभम देव,ओम भोपळे, साहिल भोपळे, वैभव उगले, श्याम गिर्हे, राम धुमाळे, मंगेश इंगळे, गणेश खुमकर, शिवा राखोंडे, संघपाल भटकर, गौतम वरठे, विनोद डिगे, सिद्धार्थ डिगे, प्रमोद डिगे, बब्बूभाई, प्रवीण डिगे,सचिन डिगे, जितेंद्र डिगे, सतीश डिगे इत्यादी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
अधिक वाचा : लोकजागर मंचाच्या वतिने आयोजित हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola