अकोट(प्रतिनिधी) : आकोट तालुक्यात अमरावतीच्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून पुनर्वसित करण्यात आलेले ग्रामस्थ गेल्या काही दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी जंगलातील मूळगावी परतले होते. वनविभाग व महसूल प्रशासनाने त्यांना जंगलातून बाहेर काढण्यासाठी बरेच प्रयत्न केलेत. त्यासाठी गेल्या चार दिवसांपासून वरिष्ट अधिकारी त्यांच्याशी चर्चा करीत आहेत परंतु ग्रामस्थ मात्र आपल्या मागण्यांवर अडुन बसले असून त्या पूर्ण झाल्याशिवाय बाहेर निघण्यास तयारच नाहीत.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अमरावती स्थित क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांनी जंगलात घुसलेल्या ग्रामस्थांना दोन दिवसांत जंगलातून बाहेर न निघाल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा देखील दिला होता. जंगलात घुसताना नासधूस करून वंसंपत्तीचे नुकसान करणे,अधिकारी,कर्मचाऱ्यांना मारहाण करणे,जंगलात घुसखोरी करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या तसेच या ग्रामस्थांचे नेतृत्व करणाऱ्या काही लोकांवर चिखलदरा पोलीस ठाण्यात गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले आहेत.
केलपाणी या गावात ठान मांडून बसलेल्या या २०० ते ३०० लोकांनी आज बळाचा वापर करून नक्षलवाद्यांप्रमाणे भूमिका घेऊन जंगलात बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेल्या २० ते २५ वन अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दगडफेक करून तसेच शस्त्रे व लाठ्याकाठ्यांनी मारहाण करून जखमी केले असल्याची दुर्दैवी घटना आज १२.३० वाजताच्या दरम्यान घडली आहे.यातील जखमींना आकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून एका गंभीर जखमी वन कर्मचाऱ्याला अकोला येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
अधिक वाचा : पाण्यासाठी शिवसेना आक्रमक;उगवा फाट्यावर ‘रास्ता रोको’
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola