अकाेला (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत वंचित बहुजन आघाडीने सहभागी व्हायचे की नाही, याबाबतची भूमिका आपण २३ जानेवारी राेजी जाहीर करू, अशी माहिती भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना दिली. २०१९ च्या निवडणुकीत प्रादेशिक पक्षांना संधी देऊन काँग्रेसने २०२४ च्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
काँग्रेसमध्ये दिलदारपणा नाही, कारण त्यांची कट्टरतावादी मते आम्हाला मिळत नाहीत, असा अनुभव आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-भाजपला पराभूत करण्याचे काँग्रेसचे उद्दिष्ट असल्यास त्यांच्याकडे दिलदारपणा असायला हवा. काेलकाता येथे शनिवारी झालेल्या २२ राजकीय पक्षांच्या सभेला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना निमंत्रण हाेते की नाही, याबाबत शंकाच आहे. या सर्व पक्षांचे काँग्रेससोबत मतभेद आहेत,’ असेही अॅड. आंबेडकर म्हणाले. धनगर समाज आता तडजोड करण्याच्या मानसिकतेमध्ये नाही. आपला वापर हाेताे हे लक्षात आल्यानंतर आमच्या सभांना धनगर समाजबांधव स्वत:चा पैसा खर्च करून गर्दी करीत असून, आपल्या हक्कांसाठी ते संघर्ष करीत आहेत, असा दावाही त्यांनी केला.
सवर्ण आरक्षणाचा ताेटाच
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सवर्ण आरक्षणाचा फायदा हाेणार नाही. ब्राह्मण समाजासह सवर्णातील किती घटकांकडे १ हजार चाैरस फुटांचे घर आहे? त्यामुळेच या आरक्षणाचा फायदा हा इतर समाजातील सवर्ण असलेल्या आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या घटकांनाच हाेईल, असे अॅड. आंबेडकर म्हणाले. हिंदूंच्या सरकारमध्ये शिक्षण क्षेत्रात ओबीसींना मात्र फायदा हाेत नसून, याबाबतची राज्यातील प्रमुख संस्थांमधील आकडेवारी लवकरच जाहीर करू, असेही ते म्हणाले.
यूपीत बसपा-सपाला फायदा
मायावती यांच्या बसपा आणि समाजवादी पार्टीने डावलल्यामुळे काँग्रेसने नाइलाज म्हणून उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या सर्व ८० जागांवर उमेदवार उभे करण्याची घाेषणा केली खरी; पण त्यांनी ती अमलात आणली तर त्याचा फायदा बसपा-सपाला हाेइल, असेही अॅड. आंबेडकर म्हणाले. युती केल्यानंतर काँग्रेसच्या बाजूने असलेली कट्टर हिंदूंची मते आम्हाला मिळत नाहीत. केवळ मुस्लिम मतेच मिळतात, असा आमचा अनुभव असून, हेच महाराष्ट्रातही हाेते, असेही ते म्हणाले.
रावणाचा ना फायदा, ना ताेटा ?
उत्तर प्रदेशातील भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण यांचा निवडणुकीत किती फायदा हाेईल, या प्रश्नावर अॅड. आंबेडकर म्हणाले, ‘रावण यांच्या सभांना गर्दी जमते. मात्र, त्यातून ना राजकीय फायदा हाेईल ना ताेटा. सहानुभूती म्हणून त्यांच्या सभांना गर्दी हाेईल, पण ते मतात परिवर्तन हाेणार नाही,’ असे अॅड. आंबेडकर म्हणाले. राजेंद्र गवईंचा वेगळा पक्ष आहे. त्यांचा फाेन आला हाेता. काँग्रेससाेबतचा त्यांचाही अनुभव चांगला नसल्याचे गवई यांनी मला सांगितले हाेेते, याकडेही अॅड. आंबेडकर यांनी लक्ष वेधले.
अधिक वाचा : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांचा राजीनामा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola