अकोला (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मलकापूर येथे क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार १९ ते सोमवार २१ जानेवारीपर्यंत महोत्सव होणार आहे. यामध्ये कबड्डी व शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले असून, विदर्भातील खेळाडू यामध्ये सहभाग घेणार आहेत. स्पर्धेची जय्यत तयारी आयोजकांनी केली आहे.
कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन १९ जानेवारीला होईल. बक्षीस वितरण २० जानेवरी रोजी होईल. स्पर्धेत विदर्भातील नामांकित पुरुष व महिला आमंत्रित संघ सहभागी होणार आहेत. २१ जानेवारीला अकोला श्री शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा महोत्सवात कबड्डी स्पर्धेकरिता उत्कृष्ट असे दोन मैदाने तयार करण्यात आली आहेत.
त्याचप्रमाणे बाहेरगाववरून येणाऱ्या खेळाडूंसाठी भोजनाची व राहण्याची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे, तसेच शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी १६ बाय ४० असा भव्य मंच उभारण्यात आला आहे. स्पर्धेतील विजेता व उपविजेत्या संघांना रोख बक्षिसे व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. क्रीडा महोत्सवाची जय्यत तयारी झाली असल्याची माहिती आयोजक मंगेश काळे यांनी दिली.
अधिक वाचा : श्री जागेश्वर इंग्लिश स्कूल, वाडेगांव मध्ये गोवर -रुबेला लसीकरणाचा ९७%लसीकरणाचे उद्दीष्ट पुर्ण
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola