अकोला (प्रतिनिधी) : कापशी गावातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांची रक्कम लंपास केल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली. यावेळी पातूर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून श्वानपथक व फसी तज्ञ पथकही दाखल झाले आहे.
राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या कापशी गावामध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. या एटीएमवर सुरक्षा रक्षक नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी गॅस कटरच्या साह्याने हे एटीएम फोडले आणि लाखो रुपयांची रक्कम घेऊन पसार झाले. हा प्रकार पहाटे नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी पातूर पोलिसांना माहिती दिली.
पातूर पोलीस व श्वानपथक तसेच ठसेतज्ञ पथकही घटनास्थळी तातडीने दाखल होऊन बँकेचे अधिकारीही यावेळी आले. या एटीएममधून नेमकी किती रक्कम गेली याचा अजून पत्ता लागलेला नसून १० लाख रुपयापर्यंत चोरी केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून या एटीएमवर आधीही चोरीचा प्रयत्न झाला असल्याची चर्चा गावात आहे.
अधिक वाचा : अतिक्रमण विभागाची कारवाई : नाश्त्याची दुकाने, पान टपऱ्या आदींचे अतिक्रमण तोडले
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola