अकोला (प्रतिनिधी) : अकोला मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने रामदासपेठ येथील बिर्ला गेट जवळील नाश्त्याची दुकाने, पान टपऱ्या आदींचे अतिक्रमण तोडले.
स्टेशन रोडवरील जिल्हा न्यायालय समोरील अवैध दुकाने काढण्यात आली. बुट चप्पलचे दुकान तोडून सामान जप्त करण्यात आले. अतिक्रमण विभागाने जनता भाजी बाजार समोरील राहादरीस अडथळा निर्माण करणाऱ्या हातगाड्या तोडल्या. तसेच जिल्हा स्त्री रुग्णालय समोरील अतिक्रमण काढले.
या सोबतच सिटी कोतवाली ते नवीन बस स्थानक, गांधी चौक ते जैन मंदिर, दाना बाजार, डॉ बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह ते फतेह चौक, जनता बाजार समोरील हॉकर्स तसेच इतर अतिक्रमण धारकांविरुद्ध कारवाई करण्यात आली.
अतिक्रमण निर्मूलन पथकाने या कारवाई सोबतच शहरातील पोल बोर्ड, अवैध फलक, होर्डिंगस इत्यादी देखील काढले. ही कारवाई मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्या आदेशान्वये अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र घनबहादुर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण मिश्रा, संजय थोरात, प्रवीण इंगोले, संतोष ठाकूर,सोनवणे, तिवारी, गोपनारायण, सैय्यद रफिक, मगर, महेंद्र टाक इत्यादी अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांनी पार पाडली.
अधिक वाचा : अकोट ते खंडवा ब्रॉडगेज रेल्वेमार्ग सातपुड्याच्या जंगलातुन न जाणार पर्यायी मार्गाने !
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola