अकोला (शब्बीर खान) : गोवंशाचे मांस घेऊन जाणारया वाहनाला पकडून पोलिसांनी ३० हजार रूपयांचे गोवंश मांस जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अकोट शहर पोलिसांच्या डीबी पथकाला एमएच ३१ सी एम ८६९३ नंबरच्या कारमध्ये दोन इसम गोवंशाचे मांस घेऊन नंदीपेठकडू दरयापूर रोडकडे जात असल्याची गुप्त माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारावर पोलिसांनी ताना निसग? डब्ब्यासमोर दर्यापूर रोड अकोट येथे नाकेबंदी करून कारची झडती घेतली. यात १५० किलो गोमांस मिळून आले असून. हे मांस कारच्या मागील सिटवर ठेवलेल्या दोन पोत्यात मिळाले. सदरच्या कारवाई मध्ये कारसह १ लाख ८० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करून मोहम्मद अन्सार शेख करिम, मोहम्मद असीम मोहम्मद सलीम रा. आंबोळी वेस अकोट दोघांना अटक करून पोस्टे ला अप नं २० /१९ कलम ५ (क),९ (अ) प्राणी संरक्षण अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल केला.
ही कारवाई उप विभागीय पोलिस अधिकारी सुनिल सोनवणे अकोट शहरचे ठानेदार संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे सहा.पोलिस निरीक्षक ज्ञानोबा फड,कासम नौरंगाबादी, उमेश पराये, सचिन सोनटक्के, विजय चव्हाण यांनी केली.
अधिक वाचा : जमिनीच्या वादावरून पोटच्या मुलाने केली ७० वर्षीय बापाची हत्या
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola