वाॅश्गिंटन – पर्सनल काॅम्युटरमध्ये आजही अनेक यूजर्स विंडोजची जुनी ऑपरेटिंग सिस्टम वापरताना दिसतात. यूजर्सना विडोंज 10 ऑपरेटिंग सिस्टममध्ये स्विच होणे कठीण जात असेल किंवा विंडोज 7 ऑपरेटिंग सिस्टमची सवय झाली असेल त्यामुळे आजही युजर्स विंडोज 7 ऑपरेटिंग सिस्टमचाच आपल्या काॅम्युटरमध्ये वापर करताना दिसतात.
दरम्यान, आता याच यूजर्सना नवीन अपडेटेड ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे विडोंज 10 आपल्या काॅम्युटरमध्ये अपडेट करावेच लागेल कारण मायक्रोसाॅफ्टने एका वर्षानंतर विंडोज 7 ऑपरेटिंग सिस्टमसाठी सिक्युरीटी अपडेट व फ्री सपोर्ट देणं बंद करण्याची घोषणा केली आहे.
मायक्रोसाॅफ्टसाठी विंडोज 7 ऑपरेटिंग सिस्टम ही मोठी यशस्वी ठरली होती. यानंतर विंडोज 8 आले, जे काहीच लोकांना पंसतीस आले. यानंतर विडोंज 10 आले पण मायक्रोसाॅफ्टच्या नव्या अद्यावत माॅडेल आणि इंडीग्रेटेड जाहिरातींमुळे अनेक यूजर्स मायक्रोसाॅफ्टच्या विंडोज 10 पासून लांब राहिले.
तरीही विंडोज 7 ची लोकप्रियता सर्वात जास्त राहिली. आताही एनालिटिक्स सर्व्हिस नेट अॅप्लिकेशनच्या नुसार विडोंज 7 जवळजवळ 42.8 टक्के विंडोज काॅम्युटरवर इंस्टाॅल आहे आणि त्याचा वापर केला जातो. ही संख्या खूप मोठी आहे. असं सांगण्यात येत की, 14 जानेवारी 2020 पासून विडोंज 7 अपडेट बंद झाले तरी त्यानंतरही युजर्स काॅम्युटरमध्ये त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात करत राहतील.
दरम्यान मायक्रोसाॅफ्ट कंपनी ठराविक कालावधीपर्यंत यूजर्सला विंडोज 7 वरून स्विच होण्यासाठी जोर देत आहे. सांगण्यात येतय की फक्त एकच वर्ष फ्री सर्पोट मिळणार आहे. त्यानंतर तीन वर्षापर्यंत ठराविक रक्कम दिल्यास सिक्युरिटी अपडेट मिळतील, त्यानंतर त्यांचीही किमंत प्रत्येक वर्षी वाढतच जाईल.
अधिक वाचा : मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक पॉल अॅलन यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी निधन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola