अभिनेता तसेच दिग्दर्शक असलेला फरहान अख्तर हा लवकरच बॉक्सरच्या भूमिकेत झळकणार आहे. दिग्दर्शक ओमप्रकाश मेहरा यांच्यासोबत ६ वर्षानंतर तो पुन्हा एकदा चित्रपटात काम करणार आहे. मेहरा यांच्यासोबत त्याने ‘रंग दे बसंती‘ आणि ‘भाग मिल्खा भाग‘ यांसारखया चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले आहे. आता पुन्हा एकदा दोघेही बॉक्सिंगवर आधारित चित्रपट तयार करणार आहेत.
या चित्रपटाचे नाव ‘तुफान’ असे राहणार आहे. या चित्रपटात फरहान बॉक्सरच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाला फरहान आणि रितेश सिंधवानी प्रोड्यूस करणार आहेत. हा चित्रपट कोणाचाही बायोपिक नाही. या चित्रपटाची कथा अंजुम राबाबली हे लिहित आहेत. चित्रपटाची तयारी सुरू झाली आहे. बॉक्सरच्या भूमिकेसाठी फरहान बॉक्सिंगचे प्रशिक्षणही घेत आहे. त्यामुळे आता ‘मिल्खा’नंतर तो बॉक्सिंगची भूमिका कशाप्रकारे साकारतो, याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
IT’S OFFICIAL… After #BhaagMilkhaBhaag, Rakeysh Omprakash Mehra and Farhan Akhtar reunite for #Toofan… A heartfelt story of a boxer… Mehra will direct the film.
— taran adarsh (@taran_adarsh) January 16, 2019
फरहान सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील रिलेशनशीपमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपासून तो शिबानी दांडेकरला डेट करत आहे. त्यांचे बरेचसे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
अधिक वाचा : बिग बी-तापसी पन्नू यांच्या बदला चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola