• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 7, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मागण्या पूर्ण न झाल्याने पुनर्वसित गावकऱ्यांचा मेळघाटच्या जंगलात प्रवेश, धारगडमध्ये दाखल

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
May 16, 2020
in Featured, ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
81 0
0
अकोट
12
SHARES
582
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट (प्रतिनिधी): पोपटखेड मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून अकोट तालुक्यात पुनर्वसन केलेल्या ८ गावांतील अदिवासी ग्रामस्थांनी मागण्या पूर्ण न झाल्याने पुन्हा आपल्या जुन्या ठिकाणी परतण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सोमवारी त्यांनी मेळघाट उपवनसंरक्षक कार्यालयात निवेदन देऊन पोपटखेड गेट पार करत जंगलात प्रवेश केला. रात्रभर खटकाली येथे मुक्काम केल्यानंतर आज ग्रामस्थ धारगड येथे पोहोचले. यावेळी मोठ्या प्रमाणात वन विभागाचा व पोलिसांचा ताफा तैनात होता.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील नागरतास, अमोना, बारुखेडा, धारगड, गुल्लरघाट, सोमठाणा, केलपणी, या गावाचे पुनर्वसन करण्यात आले. पुनर्वसनामुळे शेतजमीन गेली. जीविकेचे साधन तसेच मुलभूत सुविधा नसल्याने विविध आजाराने २७४ ग्रामस्थांचा मृत्यू झाला. आतापर्यंत कोणतेही मागण्यांची पूर्तता न झाल्याने आमच्या जुन्या बागेत परत जात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. आता मेलो तरी जंगलातून बाहेर निघणार नाही. शासनावर व अधिकाऱ्यांवर आमचा विश्‍वास नसल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

अदिवासी ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेतल्याने या ठिकाणी वनविभाग व पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला होता. मात्र, संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गेट पायदळी तुडवीत सोबत उदरनिर्वाहाचे साधन मुलेबाळे काही जणांनी जनावरेसुद्धा सोबत घेऊन जुन्या गावाची वाट धरली. जंगलात घुसलेल्या पुनर्वसित गावकऱ्यांनी पोपटखेड पार केल्यानंतर आपला पहिला पडाव खटकाली गेट समोर टाकला.

आठ गावातील पुनर्वसित गावकरी यापूर्वी दोन वेळा जुन्या गावी परतले होते. दरम्यान, वनविभाग व महसूल विभागाने त्यांच्या आंदोलनाची दखल घेत अकोट व तेल्हारा तालुक्यातील पुनर्वसित गावासाठी निधी उपलब्ध करून देत, सोयीसुविधा व पायाभूत विकास कामांना गती देण्याचा प्रयत्न केला. महसूल प्रशिक्षण ११५ एकर जमीन पुनर्वसित गावकऱ्यांना देण्यासाठी उपलब्ध केली. शासनाने पुनर्वसित गावकऱ्यांना पुनर्वसन करताना आश्वासन देत कुठल्याही सोयीसुविधा पूर्ण केल्या नाहीत.

जमीन सर्वांना उपलब्ध नाही, रोजगाराचे साधन नाही आदी विविध अडचणी व व्यथा घेऊन अकोला येथेही ५० किलोमीटर पायपीट करत ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. मात्र, यावरही तोडगा निघाला नाही. पुर्नवसित आदिवासी ग्रामस्थ धारगड येथे दाखल झाले आहेत. त्यामुळे वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चिखलदरा, अमरावतीचे अतिरिक्त पोलीस संबंधित ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.

अधिक वाचा : अकोल्यात चायना मांजामुळे मान कापली गेल्याने दोघे जखमी

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

वृद्ध पित्याची हत्या : मुलगा, सुनेची रवानगी कारागृहात

Next Post

उन्हाळ्यात टंचाई निवारणास लागणार 7.30 कोटी रुपये; प्रति परवानगीची गरज नसल्याने उपाययोजनांची कामेही सुरू

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
उन्हाळ्यात टंचाई निवारणास लागणार 7.30 कोटी रुपये; प्रति परवानगीची गरज नसल्याने उपाययोजनांची कामेही सुरू

उन्हाळ्यात टंचाई निवारणास लागणार 7.30 कोटी रुपये; प्रति परवानगीची गरज नसल्याने उपाययोजनांची कामेही सुरू

फरहान अख्तर

फरहान अख्तर व ओमप्रकाश मेहरा 'तुफान' चित्रपटासाठी एकत्र

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.