अकोला (प्रतिनिधी) – मकर संक्रांतीनिमित्त लोक पतंग उडविण्याचा आनंद घेत आहेत. असे असतानाच दुसरीकडे मात्र, पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चायना मांजामुळे २ वाहन चालकांची मान कापली गेल्याची घटना घडली आहे. शिवनी आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर मंगळवारी दुपारी ही घटना घडली. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून यासंदर्भात अद्याप कुठल्याही प्रकारची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आलेली नाही.
मांजामुळे, अशा प्रकारच्या अनेक घटना घडत असल्याचे वृत्त ईनाडू इंडियाने २ दिवसपूर्वीच प्रकाशित केले होते. तरीही संबंधित यंत्रणेकडून यासंदर्भात कोणतीच कारवाई न झाल्याने, अशा घटना घडत असल्याचे दिसून येत आहे.
शिवनी येथील शांतीनगरमध्ये राहणारे शेख कासम शेख हुसेन हे कामावर जात असताना मलकापूर जवळील स्मशानभूमीसमोर त्यांच्या मानेला, हाताला व पायाला चायना मांजाने जखडून घेतले. काही वेळ काय घडले हे त्यांना कळलेच नाही. ज्यावेळेस त्यांच्या हाताला व मानेला दुखापत झाली. तसेच रक्त निघाले. तेव्हा त्यांना आपल्याला चायना मांजामुळे दुखापत झाल्याचे लक्षात आले. त्यांनी लगेच जवळच्या खाजगी रुग्णालयात जाऊन उपचार करून घेतले त्यांच्या मानेवर २१ टाके पडले आहेत. तर बोटाला ११ टाके पडले आहेत. ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. यासंदर्भात अद्याप कुठल्याही प्रकारची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आलेली नाही.
दुसरी घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील मानव मोटर्सजवळ घडली. रिजवान याकूब पोहावाला हे दुचाकी (एमएच ३० एयु ४२२०) ने किराणा बाजार येथे जात होते. त्यांच्या मानेवर मांजा गुंडाळला गेला. त्यामुळे त्यांची मान कापली गेली यामुळे ते खाली पडले. त्यांच्या डोक्यावर मोठी दुखापत झाली आहे. त्यांना डॉक्टर अमोल रावणकर यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या मानेवर २२ टाके पडले आहेत. त्यांच्या डोक्याला दुखापत असल्याने त्यांना सिटीस्कॅनसाठी पाठविण्यात आल्याची माहिती डॉ. अमोल रावणकर यांनी दिली.
अधिक वाचा : पातूर -बाळापूर मार्गावर युवकाचाअपघातात मृत्यु
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola